लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या सेवा असतानाही राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर शहर आणि विभागातही कोरोना रुग्णसंख्या अत्यंत कमी आहे. हे येथील सतर्क प्रशासकीय यंत्रणा, लॉकडाऊनदरम्यान लोकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवून दिलेली साथ यामुळेच शक्य झाले. यापुढेही लॉकडाऊनला प्रत्येक व्यक्तीने गांभीर्याने घेतले तर नागपूर विभागातील साखळी लवकरच तुटेल.विलगीकरणच कोरोनाविरुद्धच्या युद्धात विजय मिळविण्यासाठी प्रभावी शस्त्र आहे. त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने करावा, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.‘कोरोनावरील उपाययोजना आणि नागपूर विभाग’ या विषयावर नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नागरिकांना विलग राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन केले. केंद्र आणि राज्य शासनाने जे लॉकडाऊन घोषित केले आहे, ते तुमच्या-आमच्या सर्वांच्या पुढील आयुष्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा आता प्रत्येक व्यक्तीला त्रास होत असेल तरी हा त्रास आपल्या सुरक्षित भविष्यासाठी सहन करावा लागेल. नागरिकांनी आतापर्यंत दिली तशीच साथ पुढेही दिली तर नागपूर विभागात कोरोनाच्या प्रसारावर प्रतिबंध घालता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विभागातील बहुतांश रुग्ण हे नागपूर शहरातील असल्यामुळे ज्या भागात रुग्ण आढळले तो भाग महानगरपालिका प्रशासनातर्फे तातडीने सील करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना लगेच क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर बऱ्याच अंशी अंकुश मिळविता आला असल्याचे त्यांनी सांगितले.
'कोरोना'विरुद्धच्या युद्धावर विलगीकरणानेच मिळणार विजय : विभागीय आयुक्त संजीव कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:42 PM
विलगीकरणच कोरोनाविरुद्धच्या युद्धात विजय मिळविण्यासाठी प्रभावी शस्त्र आहे. त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने करावा, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.
ठळक मुद्दे‘फेसबुक लाईव्ह’द्वारे साधला संवाद