शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

व्यापाऱ्यांचे २८ सप्टेंबरला भारत बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:37 PM

वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील आणि रिटेल व्यवसायात विदेशी गुंतवणुकीला विरोध करीत कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २८ सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. देशातील लहानमोठ्या सर्व बाजारपेठा या दिवशी बंद राहणार आहे. देशातील जवळपास सात कोटी व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्दे वॉलमार्ट डील व रिटेलमध्ये विदेशी गुंतवणुकीला विरोध : ‘कॅट’तर्फे २८ राज्यांमध्ये रथयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील आणि रिटेल व्यवसायात विदेशी गुंतवणुकीला विरोध करीत कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २८ सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. देशातील लहानमोठ्या सर्व बाजारपेठा या दिवशी बंद राहणार आहे. देशातील जवळपास सात कोटी व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होणार आहेत.आंदोलनांतर्गत ‘कॅट’तर्फे दिल्लीच्या चांदनी चौकातून १५ सप्टेंबरपासून दिल्लीतून ९० दिवसीय डिजिटल रथयात्रा सुरू करणार आहे. रथयात्रा १६ डिसेंबरला दिल्लीत मोठ्या रॅलीत परावर्तित होणार आहे. या संदर्भात कॅटच्या व्यापाऱ्यांकडून संबंधित ज्वलंत विषयांवर एक व्यापारी चार्टर जारी करण्यात येणार आहे. 

लहानमोठा व्यवसाय संपुष्टात येणार‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, रथयात्रा देशाच्या २८ राज्यांच्या १२० प्रमुख शहरांतून जवळपास २२ हजार कि़मी.चा पल्ला गाठणार आहे. वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील देशातील लहान व्यापाºयांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे. कारण वॉलमार्ट फ्लिपकार्ट ई-कॉमर्स व्यासपीठाचा उपयोग करून देशातील रिटेल बाजारात जगभरातून खरेदी केलेल्या वस्तूंच्या विक्री करणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि छोट्या उत्पादकांना फटका बसेल. एका वृत्तानुसार वॉलमार्टनंतर आता अ‍ॅमेझॉन आणि अलीबाबासुद्धा अशाच प्रकारच्या डीलसाठी प्रयत्नरत आहे. सरकारसुद्धा याकरिता अनुकूल आहे. त्यामुळे देशातील रिटेल बाजार केवळ ठराविक लोकांच्या हातात जाईल आणि भांडवलदारांचे वर्चस्व होईल. छोटे व्यापारी त्यांचा सामना करण्यास सक्षम नसतील.ही भविष्यातील शक्यता ध्यानात ठेवून ‘कॅट’ने त्यांचा विरोध दर्शविण्यासाठी २८ सप्टेंबरला देशभरात व्यापार बंदचे आवाहन केले आहे. सरकारने या संदर्भात गांभीर्याने दखल देऊन वॉलमार्ट फ्लिपकार्टची डील रद्द करावी. ही डील सरकारच्या वर्ष-२०१६ च्या प्रेस नोट-३ चे उल्लंघन आहे. 

आठ लाख केमिस्टांची दुकाने बंद राहणारदेशाच्या विविध राज्यातील बंदला समर्थन मिळत आहे. आॅल इंडिया केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत बंदला समर्थन दिले आहे. देशातील आठ लाख केमिस्ट या दिवशी दुकाने बंद ठेवणार आहे. तर दुसरीकडे आॅल इंडिया फेडरेशन आॅफ एफएमसीजी डिस्ट्रीब्युट्सनेसुद्धा भारत बंदचे समर्थन केले आहे.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदnagpurनागपूर