लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या २७ दिवसांमध्ये आठ मनोरुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याने खळबळ उडाली आहे. १५ मे रोजी मनोरुग्णालयातील एका २१ वर्षीय गतिमंद, क्षयरोगाने ग्रस्त तरुणीचा मृत्यू मेयो रुग्णालयात झाला.पूजा (२१) असे अनोळखी मनोरुग्ण तरुणीचे नाव.मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गतिमंद होती. शिवाय तिला क्षयरोगासोबत इतरही आजार होते. २०१५ पासून ती मनोरुग्णालयात भरती होती. तिची उंची केवळ साडेचार फूट होती. हातपाय वाकडे होते. वयाप्रमाणे तिची वाढ झाली नव्हती. आठवडाभरापूर्वी तिच्या शरीरावर सूज आली. क्षयरोगाने ग्रस्त असल्यामुळे प्रशासनाने तिला मेयो रुग्णालयात भरती केले होते. आठवडाभरापासून तिच्यावर उपचार सुरू होता. अखेर शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यापूर्वी आठ मनोरुग्णांचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला आहे. मेयो रुग्णालयात मनोरुग्णाच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
नागपूर मनोरुग्णांच्या मृत्यूची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:59 AM
प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या २७ दिवसांमध्ये आठ मनोरुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याने खळबळ उडाली आहे. १५ मे रोजी मनोरुग्णालयातील एका २१ वर्षीय गतिमंद, क्षयरोगाने ग्रस्त तरुणीचा मृत्यू मेयो रुग्णालयात झाला.
ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : मेयोत उपचार घेताना तरुणीचा मृत्यू