लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारचा दिवस ‘इंडिगो एअरलाईन्स’च्या प्रवाशांची परीक्षा पाहणाराच ठरला. ‘एअरलाईन्स’चे ‘सर्व्हर’ ठीक काम करत नसल्याने प्रवाशांना ‘बोर्डिंग पास’ व तिकीट काढण्यात अडचणी आल्या शिवाय उड्डाणेदेखील रखडली होती. त्यामुळे ‘सर्व्हर’सोबतच प्रवासीदेखील ‘डाऊन’ झाल्याचे चित्र दिसून आले.‘सर्व्हर डाऊन’असल्यामुळे कुठले विमान नागपूरला कधी येणार आहे, हे देखील ‘ऑनलाईन’ समजत नव्हते. विमानतळाच्या आतमध्ये ‘बोर्डिंग पास’च्या ‘काऊंटर’वर प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रक्रियेला विलंब होत असल्याने प्रवासी संतप्त झाले होते. ‘एअरलाईन्स’च्या प्रवाशांना नाराजीचा सामना करावा लागत होता. पुणे येथून ‘सर्व्हर’मध्ये समस्या आली होती, असे सांगण्यात आले. यामुळे अनेक विमानांना विलंब झाला. ६ ई २८४ नागपूर-पुणे विमान २.१५ ऐवजी ३ वाजून ३३ मिनिटांनी पोहोचले. ६ ई १३४ पुणे-नागपूर विमान १२.२५ ऐवजी १ वाजता आले. ६ ई ५६३ चेन्नई-नागपूर विमान दुपारी १ ऐवजी १ वाजून ५६ मिनिटांनी पोहोचले. ६ ई ५३८८ मुंबई-नागपूर विमान दुपारी १.०५ ऐवजी १.५२ ला, ६ ई ४०३ मुंबई-नागपूर विमान १ तास ४० मिनिटे विलंबाने सायंकाळी ६.४० वाजता पोहोचले. ६ ई ५२५ बंगळुरू-नागपूर विमान रात्री १०.३० ऐवजी ११ वाजता पोहोचले. ‘सर्व्हर’संदर्भात ‘एअरलाईन्स’ला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही.या विमानांनादेखील झाला उशीरसोमवारी ‘एअर इंडिया’चे एआय-६४१ दिल्ली-नागपूर विमान ३६ मिनिटे विलंबासह रात्री १.५६ वाजता पोहोचले. ‘गो एअर’चे जी८-२६०१ मुंबई-नागपूर विमान १ तास १८ मिनिटे उशिराने सकाळी ९.०८ वाजता पोहोचले. तर जी८-७३१ अहमदाबाद-नागपूर विमान १.२४ मिनिटे विलंबासह दुपारी १ वाजता ‘लॅन्ड’ झाले. एआय-६२९ मुंबई-नागपूर विमान सव्वातास विलंबाने रात्री ९.५५ ला पोहोचले. जी८-२५१९ दिल्ली-नागपूर विमानाचे रात्री ८.५५ ऐवजी १०.२० ‘लॅन्डिंग’ झाले.
‘सर्व्हर’मुळे प्रवासी झाले ‘डाऊन’ :‘इंडिगो’च्या विमान प्रवाशांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:33 AM
‘एअरलाईन्स’चे ‘सर्व्हर’ ठीक काम करत नसल्याने प्रवाशांना ‘बोर्डिंग पास’ व तिकीट काढण्यात अडचणी आल्या शिवाय उड्डाणेदेखील रखडली होती.
ठळक मुद्देउड्डाणेदेखील रखडली