शंकर आणि श्याम फुलवालेरामनगरच्या राम मंदिराला लागून असलेल्या श्याम फुलवाले या पुष्प विक्रेत्याने याही वर्षी प्रसाद वितरण केले. पुष्प विक्रेता जितू सेलोकर यांनी सांगितले की त्यांची टीम गेल्या दहा-बारा वर्षापासून शोभायात्रेनिमित्त मसाला भात आणि पाणी वितरित करीत आहेत. त्यांच्या टीममध्ये सुधीर मानकर, नरेश बावनकर, रमेश हरडे, सोनु मिरे यांचा समावेश आहे. त्यांच्या बाजूला असलेले पुष्प विक्रेता शंकर खापेकर यांनीही प्रसाद वितरण केले.व्यापारी मित्र मंडळबाजीप्रभू चौक, रामनगर येथील व्यापाऱ्यांचा समूह व्यापारी मित्र मंडळातर्फे शोभायात्रेत येणाऱ्यां भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले. मंडळातर्फे गेल्या १० वर्षापासून हे सेवाकार्य केले जात आहे. मंडळामध्ये अनुप साखला, राजेश तुरंग, ब्रिजेश मिश्रा, समीर तिवारी, डॉ. लोकेश जप्पा, मनिष साखला, शास्वत गोखले, रमेश सटवे, रवी अग्रवाल, अमोल पुसदकर, सुमित पांडे, दिनेश तराळ, सत्यजित डिडोलकर आदींचा समावेश आहे.बाजीप्रभू चौकात इडली वितरणबाजीप्रभू चौकातील जयलक्ष्मी मिष्ठान्न, कैलास फुटवेअर, बजरंग पान शॉप व इतर दुकानदारांतर्फे इडली वितरण करण्यात आले. गेल्या ४० वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. त्यांनी ३००० इडलींचे वितरण केले. या मंडळात चंदु सिरीया, रामेश्वर अग्रवाल, देवांग मिश्रा, राजेश केवलानी, मनोज केवलानी, दीपक लालवानी आदींचा समावेश आहे.लक्ष्मीकृपाच्या रहिवाशांतर्फे प्रसाद वितरणशोभायात्रेच्या मार्गावरील लक्ष्मीकृपा अपार्टमेंटच्या रहिवाशांतर्फे रामभक्तांना मसाला भात, बुंदी व ताक वितरण करण्यात आले. त्यांचा हा सेवा उपक्रम दरवर्षी केला जातो. राकेश वर्मा, निलेश मोटवानी, तासिफ खान, चंद्रशेखर भोजराज व संपूर्ण अपार्टमेंट रहिवाशांचा समावेश होता. पश्चिम नागपूर भाजपा व्यापारी संघगोकुळपेठ बाजार परिसरात पश्चिम नागपूर भाजपा व्यापारी संघ व कोठारी आॅटोमोबाईल्सतर्फे शोभायात्रेतील भक्तांवर पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तांना शरबत वितरणही करण्यात आले. मंडळामध्ये अजय शर्मा, तुषार कोठारी, राजू सातपुते व इतर व्यापाऱ्यांचा समावेश आहे. चावीवाल्यांकडून प्रसाद वितरणकॉफी हाऊस चौक मार्गावरील सुनील चाबीवाले तसेच असरार चाबीवाले यांच्याकडून शोभायात्रेत सहभागी भक्तांना प्रसाद वितरण व पाण्याचे वाटप करण्यात आले. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचे असरार चाबीवाले यांनी सांगितले. रोटरॅक्ट क्लबतर्फे मिठाईचे वितरणरामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील रोटरॅक्ट क्लबतर्फे भाविकांना गोकुळपेठ चौकात मिठाईचे वितरण करण्यात आले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रोटरॅक्ट क्लबचे रोहित तिवारी, संचित तिवारी, पराग बोहरा, गरीमा देवनानी, दिपेश गुप्ता, शांतनु काळे, सजल साहू, चिन्मय भोगावकर यांनी आपल्या सेवा दिल्या.एनआयटी शॉप किपर्स असोसिएशन गोकुळपेठगोकुळपेठेतील एनआयटी शॉप किपर्स असोसिएशनतर्फे १०० किलो पोहा, १०० किलो चणा मसालाचे वितरण करण्यात आले. मागील पाच वर्षांपासून असोसिएशनने हा उपक्रम गोकुळपेठ परिसरात सुरू केला आहे. असोसिएशनचे प्रवीण गुप्ता, विनोद जग्याशी, प्रदीप साठे, रमेश दवे, दीपक जोशी, आदिल बिराणी, सनी जग्याशी, सतीश दवे, निर्मल जैन, कमल मूलचंदानी यांनी आपली सेवा दिली.पूर्वी डेव्हलपर्सपूर्वी डेव्हलपर्सच्या वतीने भाविकांना बुंदी, बिस्किट आणि पाणी पाऊचचे वितरण करण्यात आले. प्रशांत ठाकरे, प्रशांत भोयर, सतीश बरबटे, सतीश अग्रवाल, राकेश शर्मा, सम्राट सरसवार, साईनाथ जाधव, श्रीकांत भोगे, परम ठाकरे, जितेश कुळकर्णी, प्रणय कुंभारे, सिद्धेश राठी, आदित पुरोहित, चिराग गोलछा, चिन्मय वांढरे, चिन्मय देशपांडे, चैतन्य देशपांडे, संजय सरायकर यांनी आपली सेवा दिली.या ताज सेवा मंडळ, अग्रसेन चौकमंडळातर्फे अग्रसेन चौकात मागील १० वर्षांपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मंडळाने भाविकांना ५० किलो चणा वितरण केले. इरफान शेख, रिहान भाई, विकास बोरकर, इम्रान शेख, मानु शिखरवार, शम्मी गौरे, सय्यद इरफान, प्रशांत सबनीस, संजय मसराम, सतीश दहिवडे, सुनील चटप, मनोज चटप, प्रशांत सवाने यांनी आपली सेवा दिली.धरमपेठ सार्वजनिक गणेशोत्सवनगरसेविका विशाखा मैंद आणि धरमपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे झेंडा चौकात भाविकांना लस्सी वितरण करण्यात आले. चौकात भाविकांना भव्य पडद्यावर रामायणाचे प्रवचन पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मनोज गटलेवार, बिपीन उन्हाळे, किशोर गटलवार, अमित नायडू, अर्पित येडलवार, सागर भाटीया, तुषार तिडके, मनोज हिरणवार, कालु कनोजिया, पंकज जोशी, राहुल कनोजिया, प्रदीप कुळकर्णी, ताराचंद हिरणवार, विजय जैन, उमेश अग्रवाल, अय्युब भाटी, पिंकेश यादव, मयूर चवळे, अर्पित पागे, आनंद गामोट यांनी आपल्या सेवा दिल्या.धरमपेठ खरे टाऊन व्यापारी मंडळमंडळाच्या वतीने २० हजार राजगिरा लाडू आणि ११०० किलो मसाला चनाचे वितरण करण्यात आले. मंडळाचे मनोज ध्रुव, गणेश श्रीवास, पराग कुळकर्णी, राजा गुलवाडे, गिरीश हलवदिया, राजेश कोठारी, सुनील लछवानी, चंदू तालेवार, पीयूष जैस्वाल यांनी भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले.विदर्भ संगम मित्र मंडळ, धरमपेठमंडळातर्फे मागील २० वर्षांपासून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. यावर्षी मंडळाने १५० किलो केशरी साखर भाताचे वितरण केले. मंडळाचे नवीन भोंडवे, सुनील पानबुडे, नागेश पटवारी, वरुण भोंडवे, धवल पुराणिक, मोहन मोरवणे, अतुल आगवण, सुधीर सारवे, दिनेश शिंगारे, विनोद जोशी, अनिकेत डाकवाल, सचिन पिंपळे, निरु पिंपळे, संकेत माहुरकर, चंद्रशेखर करंडे, राजेश काळी यांनी आपली सेवा दिली.शिक्षक सहकारी बँक धरमपेठ शाखाबँकेच्या वतीने धरमपेठ परिसरात शिरा आणि ११, १११ बुंदीच्या लाडूचे वितरण करण्यात आले. बँकेचे सुभाष देशपांडे, श्रीकांत भुयारकर, शशी पाठक, संजय बोरीकर, प्रमोद पारधी, पुष्कर दिवेकर, रमेश देशपांडे, बंडू रोकडे, जगदीश तांबे यांनी आपली सेवा दिली.
सेवाभावी संस्थांचा सेवाभाव
By admin | Published: April 16, 2016 2:45 AM