लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांना तातडीने दवाखान्यात घेऊन जाणे किंवा विविध टेस्टसाठी सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता नागरिकांना भासत आहे. रुग्णवाहिकेचे मालक, चालक रुग्णांच्या नातलगांकडून जास्तीचे भाडे आकारत आहेत. या संदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेचे दर निश्चित करावे व जे जास्तीचे भाडे आकारले जात आहे, त्यासाठी आपल्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करावा. उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ ही कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.आशिष अटलोए यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केली आहे.