रामटेक : तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने रामटेक शहरात शनिवारी (दि. १२) लाेकअदालतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात दिवाणी व फाैजदारी न्याय पॅनलसमाेर एकूण १३८ प्रकरणे निर्णयाधीन ठेवण्यात आली हाेती. यातील ५० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या लाेकअदालतमध्ये एनआय ॲक्ट, बँक व पतसंस्था, ग्रामपंचायतींचे मालमत्ता व पाणीकर यासह अन्य प्रकरणे ठेवण्यात आली हाेती. यातील ४४ बँक व कर दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. न्यायाधीश व्ही. पी. धुर्वे, न्यायाधीश ए. एम. जाेशी, विधिसेवा समितीचे अध्यक्ष एस. डी. मेहता, वकील संघाचे सचिव एम. व्ही. येरपुडे यांनी न्यायदान प्रक्रिया पार पाडली. याप्रसंगी न्यायालय अधीक्षक ए. एम. काेतेवार, लघुलेखक डी. एच. धाेपटे, लिपिक एच. बी. पराते, एम. एन. घाेडमारे, वानखेडे, डी. बी. पाकळे, डी. जी. हनवतकर, आकाश येरपुडे, एस. व्ही. डाेंगरे, साकुरे, हाडे, सुरपाम, देव, कटारे यांच्यासह भारतीय स्टेट बँक, युकाे बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडाेदा तसेच पतसंस्थांचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित हाेते. यावेळी प्रत्येकाला मास्क लावून, हात सॅनिटाईझ करून, त्यांच्या शरीराचे तापमान माेजून आत प्रवेश देण्यात आला हाेता. बसण्याची व्यवस्थाही फिजिकल डिस्टन्सिंग लक्षात घेत करण्यात आली हाेती.