शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

वाघाच्या हल्ल्यात सात गाई ठार

By admin | Published: February 20, 2016 3:29 AM

तीन ते पाच वाघांनी शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यात सात जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, नऊ जनावरे गंभीर जखमी झालीत.

उमरेड, नवेगाव शिवारातील घटना : ९ जनावरे गंभीर जखमी, ३१ बेपत्ताउमरेड : तीन ते पाच वाघांनी शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यात सात जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, नऊ जनावरे गंभीर जखमी झालीत. शिवाय, ३१ जनावरे बेपत्ता आहेत. ही घटना उमरेड येथून १० कि.मी.वरील नवेगाव (साधू) शिवारात गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दहशत निर्माण झाली आहे. श्रीराम बनकर, रा. नवेगाव (साधू), ता. उमरेड यांची गावालगत शेती आहे. या शेतात गुरांची दावण असून, त्यात १२० जनावरे नेहमीप्रमाणे बांधली होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे पाच वाघांनी या जनावरांवर एकाचवेळी हल्ला चढविला. पहाटेपर्यंत वाघांची शिकारीसाठी ओढाताण सुरू होती. सर्वच जनावरे जीवाच्या आकांताने सुसाट सैरावैरा पळत होती, हंबरडा फोडत होती. अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रसंग श्रीराम बनकर यांनी प्रत्यक्ष अनुभवला. ते शेतातील मचाणावर जागली करीत होते.माहिती मिळताच ग्रामस्थांनी सकाळी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. दुसरीकडे, सूचना देऊनही सकाळी ९.३० वाजेपर्यंत वनविभागाचा एकही बडा अधिकारी घटनास्थळी हजर झाला नाही. ‘साहेब, गेले कुठे’ अशी विचारणा वनविभागातील वाहनचालक शकील शेख यांना केली असता ‘ते’ नागपूरहून येत असल्याचे सांगितले. वनरक्षक पी. टी. कामडी, वनमजूर ए. बी. वैरागडे, वन्यजीवचे नितीन राठोड, प्रशांत हिवरकर शेतकऱ्यांची विचारपूस करून पंचनामा करीत होते. (प्रतिनिधी)‘चांदी’चे बछडे असावेतया घटनेबाबत वन्यप्रेमी सुहास बोकडे, पक्षीतज्ज्ञ नितीन राहाटे यांच्याशी चर्चा केली असता, हे चांदी नामक वाघिणीचे बछडे असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. चांदीला चार बछडे असून, ते १८ महिन्यांचे आहेत. गाय व वासरांच्या शरीरावरील जखमा फारशा खोल नाहीत. हल्ला करीत असताना सैरावैरा पळत सुटल्यानेच वाघही भीतीने जनावरांवर तुटून पडले असावेत आणि यातच जनावरांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा हल्ला नवलच वाघ कधीच समूहाने शिकार करीत नाही. तो गनिमी काव्याने शिकार करतो. परंतु, चांदीचे बछडे १८ महिन्यांचे आहेत. ते शिकार शोधण्यासाठी समूहाने पोहचले. जनावरांच्या कळपावर हल्ला करताच जनावरे सुसाट पळायला लागली. वाघही गोंधळले आणि त्यातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. असा प्रकार सहसा घडत नाही. बछड्यांच्या सोबतीला चांदी नसावी, असेही बोलले जात आहे.मोबदला ताबडतोब हवावन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे ठार झाल्यानंतर वनविभाग तातडीने मोबदला देत नाही, अशी कैफियत विठ्ठल बोढे यांनी मांडली. या हल्ल्यात ठार व जखमी झालेल्या जनावरांच्या मालकांना तातडीने बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी माजी नगरसेवक दयालचंद्र पौनीकर, गोविंदा बोढे, देवराव कोळसे यांनी केली आहे. अभयारण्याच्या सभोवताल सौरऊर्जा कुंपण लावण्याची मागणीही सचिन तळेकर यांनी केली. लोकप्रतिनिधी व वनविभाग या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.वाघांना पाहून घाबरलोमी मचाणावर झोपून होतो. त्यातच जनावरांच्या हंबरण्याचा आवाज ऐकायला आला. वरूनच वाकून बघितले तेव्हा एक वाघ काही अंतरावरच गाईवर तुटून पडत होता. दोन-तीन वाघ काही अंतरावर गाईच्या कळपाजवळ असावेत. त्या ठिकाणीही ओढाताण सुरू होती. दावे तोडून जनावरे शेतात पळत सुटली होती. मी खूप घाबरलो. कधी वाकून बघायचो तर, कधी पांघरून घ्यायचो. सकाळी ६ वाजताच्या सुमारासच मचाणावरून खाली उतरलो. त्यानंतर लोक गोळा व्हायला लागले.- श्रीराम बनकर, शेतकरी वाघांना लागली ‘चटक’गाईला जंगलात दावणीला बांधून वाघाच्या शुटींग प्रकरणाचा लोकमतने नुकताच पर्दाफाश केला. सकाळीच लोकमतची चमू घटनास्थळी दाखल झाली. अशातच ‘भाऊ, वाघाला गाईची चटक लागली’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांनी ‘गाय’ प्रकरण किती गंभीरपणे घेतले, याचा हा नमुनाच होता.