शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

मुंबईतील एमडी तस्करासह सात जेरबंद : पावणेसहा लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:59 AM

मेफेड्रॉन (एमडी) या अत्यंत घातक तेवढ्याच महागड्या अमली पदार्थाची विविध राज्यात तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्करासह सात जणांना शनिवारी दुपारी सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कार तसेच एमडी पावडरसह ५ लाख, ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देसक्करदरा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेफेड्रॉन (एमडी) या अत्यंत घातक तेवढ्याच महागड्या अमली पदार्थाची विविध राज्यात तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्करासह सात जणांना शनिवारी दुपारी सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कार तसेच एमडी पावडरसह ५ लाख, ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.आकाश नारायण सिंग (वय २१, चकाला, अमृतनगर, स्नेहसदन - ३, अंधेरी ईस्ट, मुंबई), निहाल खान (वय २५, मोहननगर), अशरफ खान (वय २१), जाकिर शेख (वय ३२), अजहर खान (वय ३२), जॅकी ऊर्फ सलीम खान (वय २१, सर्व रा. सिंधीबन, मोठा ताजबाग) आणि बारिक चावल ऊर्फ शेख शहबाज (वय २२, रा. टीचर कॉलनी, मोठा ताजबाग) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. हे सर्व एमडीसारख्या घातक अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेले आहेत. त्यातील आकाश सिंग हा मोठा तस्कर असून, तो मुंबई, नागपूर आणि महाराष्ट्रच नव्हे तर ठिकठिकाणी एमडीची खेप पोहचवतो.सक्करदरातील शामबाग मैदानाजवळ एक जीर्ण इमारत आहे. तेथे एमडीची मोठी खेप येणार असून, खरेदी विक्री केली जाणार असल्याचे पोलिसांना शनिवारी दुपारी कळले. त्यानुसार, परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली सक्करदरा पोलिसांनी दुपारी २ च्या सुमारास तिकडे धाव घेतली. तेथे स्वीफ्ट कार (एमएच ३१/ एफए ८१८०) मध्ये काही जण पोलिसांना संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारची तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १९ . ४६० ग्राम मेफेड्रॉन पावडर आढळली. पोलिसांनी ती पावडर, तीन मोबाईल आणि कार असा एकूण ५ लाख, ८८ हजार, ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपरोक्त सात जणांना अटक करण्यात आली असून, सय्यद तनजील आणि राजा गोल्डन ऊर्फ शेख नदीम हे दोघे पोलिसांची कुणकुण लागताच पळून गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे.तस्करी पुन्हा जैसे थे !कुख्यात एमडी तस्कर आबूला अटक केल्यानंतर त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यांनी आपला धंदा गुंडाळल्याचा दावा केला जात होता. मात्र, आजच्या कारवाईतून सक्करदरातील एमडी तस्कर अजूनही पुर्वीसारखेच सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे त्यांच्यात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहायक आयुक्त धोपावकर, घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्करदराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वात पीएसआय दिगांबर राठोड, एएसआय राजू डांगे, हवलदार प्रवीण कळंबे, संजय सोनवणे, राजेश कावळे, नायक संदीप बोरसरे, आनंद जाजुर्ले, शालिकराम शेंडे, कॉन्स्टेबल विद्याधर पवनीकर, राशिद शेख, मनोज ढोले आणि पवन लांबट आदींनी ही कामगिरी बजावली.या कारवाईमुळे त्यांच्यात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहायक आयुक्त धोपावकर, घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्करदराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वात पीएसआय दिगांबर राठोड, एएसआय राजू डांगे, हवलदार प्रवीण कळंबे, संजय सोनवणे, राजेश कावळे, नायक संदीप बोरसरे, आनंद जाजुर्ले, शालिकराम शेंडे, कॉन्स्टेबल विद्याधर पवनीकर, राशिद शेख, मनोज ढोले आणि पवन लांबट आदींनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटक