ऊर्जामंत्री बावनकुळे : कोराडीत सहा तास मॅराथॉन बैठकनागपूर : महानिर्मितीची चंद्रपूर, कोराडी, पारस यासह सातही वीजनिर्मिती केंद्रे ही ‘ग्रीन" औष्णिक वीज केंद्रे म्हणून विकसित करा. त्यासाठी स्वत:ची नर्सरी तयार करा तसेच कोराडी वीज केंद्र्राला पंतप्रधानांनी भेट दिली आहे. येथील वीज केंद्राची सर्व कामे उच्च दर्जाची व्हावीत. त्यात कोणताही समझोता केला जाणार नाही. कामाचा निकृष्ट दर्जा आढळून आला तर मुख्य अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.कोराडी येथे शनिवारी सातही वीज औष्णिक वीज केंद्रांच्या आढाव्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. सातही वीज निर्मिती केंद्रे ‘ग्रीन’ करताना सध्या असलेली अनावश्यक झाडे काढून त्या ठिकाणी नवीन १० ते १५ फूट उंचीचे झाड लावा. झाडांची संख्या वाढलेली दिसावी. सर्वच केंद्रांमध्ये मोठ्या झाडांची लागण व्हावी तसेच या केंद्रांची पाहणी करता यावी म्हणून स्वतंत्रपणे ड्रोन विकत घेण्यात यावे, अशा सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी दिल्या.कोराडी वीज केद्राच्या संच क्रमांक ९ व १० चे उर्वरित काम येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देताना ऊर्जामंत्री म्हणाले, कोराडी तलावाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास आणि सौंदर्यीकरणासाठी स्वतंत्र सल्लागाराची नेमणूक करा. देवी मंदिर येथील रक्षा विभागाच्या जमिनीऐवजी सममूल्याची जमीन अहमदनगर येथे रक्षा विभागाला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ९९ एकर जमीन कोराडी येथे उपलब्ध होणार आहे. या जमिनीपैकी केंद्र सरकारच्या शिल्पग्राम योजनेसाठी जमीन उपलब्ध होणार आहे.एकूण ५७ विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला प्रबंध संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक व्ही. एम. जयदेव, महागॅम्सचे श्याम वर्धने, ए. आर. नंदनवार, एस. जी. चावरे, के. एम. चिरुटकर, आर. बी. बुरडे, डी. व्ही. खोब्रागडे, मुख्य अभियंता पंकज सपाटे, पी. एम. निखारे, ए. जी. देवतारे, एस. एम. मारुडकर, राजेश पाटील, प्रमोद नाफडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)नासुप्रशी सामंजस्य करारया बैठकीत महानिर्मितीच्या म्युझियमची (विज्ञान संग्रहालय) इमारत नासुप्रला हस्तांतरित करण्यासाठी नासुप्र आणि महानिर्मिती या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. नासुप्रचे डॉ. दीपक म्हैसेकर आणि मुख्य अभियंता पी. एम. निखारे यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
महानिर्मितीची सातही वीज केंदे्र ‘ग्रीन" करा
By admin | Published: April 24, 2017 1:52 AM