शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

हॉलमार्किंगचे सात खासगी सेंटर नागपुरात सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 8:00 AM

Nagpur News नागपुरात मोठ्या सराफा व्यापाऱ्यांचे सात तर महाराष्ट्रात जवळपास १०० पेक्षा जास्त हॉलमार्किंग सेंटर उभे राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदेशात सरकारचे अपुरे सेंटरसरकारला दागिन्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार

मोरश्वर मानापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयांतर्गत भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये दागिन्यांवर हॉलमार्किंग आणि एचयूआयडी बंधनकारक केले आहे. पण देशात बीआयएस सेंटर अपुरे असल्यामुळे केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री पीयूष गोयल यांनी खासगी सराफांना सेंटर उभारण्याची परवानगी दिली असून, त्यानुसार नागपुरात मोठ्या सराफा व्यापाऱ्यांचे सात तर महाराष्ट्रात जवळपास १०० पेक्षा जास्त सेंटर उभे राहण्याची शक्यता आहे. या सेंटरला सरकार सबसिडी देणार नसल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

(Seven private hallmarking centers to be set up in Nagpur!)

महाराष्ट्रात सुरू होणार १०० सेंटर

संपूर्ण विदर्भात नागपुरात दोन व अकोल्यात एक, असे तीन बीआयएस सेंटर आहे. त्यातुलनेत विदर्भात १० हजारापेक्षा जास्त सराफा व्यापारी आहेत. सणासह पुढे हॉलमार्किंगसाठी येणाऱ्या दागिन्यांची संख्या वाढणार आहे. सध्या दागिन्यांचे हॉलमार्किंग आणि एचयूआयडी अर्थात सहा डिजिटल आकड्यांच्या नोंदीसाठी १५ दिवस लागत आहेत. त्यामुळे सराफांकडे दागिने विक्रीसाठी उपलब्ध राहत नाही, अशी सराफांची ओरड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सराफा टास्क फोर्स संघर्ष समिती आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची तीन दिवसापूर्वी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत अनेक समस्या निकाली काढताना मंत्र्यांनी सराफांना खासगी सेंटर सुरू करण्याची मौखिक परवानगी दिली. यासंदर्भात लवकरच आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

छोट्या सराफांच्या दागिन्यांचेही होणार हॉलमार्किंग व एचयूआयडी

सराफांना हॉलमार्किंग सेंटर सुरू केल्यानंतर दागिन्यांना प्रमाणपत्र तेच देतील. एका दागिन्याच्या हॉलमार्किंगसाठी सरकार ३५ रुपये आकारते, पण खासगी सेंटरला ४० रुपये द्यावे लागतील. सरकार ५ रुपये अतिरिक्त घेत असले तरीही दागिना हॉलमार्क होऊन दुसऱ्याच दिवशी सराफांच्या हातात जाईल. त्यामुळे शोरूममधील स्टॉक कमी होणार नाही व व्यवसाय सुलभ होईल.

सराफा म्हणाले, बैठकीत मंत्र्यांनी अनेक निर्णय घेतले. एचयूआयडी दागिना कोणत्या ग्राहकाने घेतला, त्याचे नाव उघड करण्यात येणार नाही. शिवाय दागिन्यांसाठी जनरेट झालेला एचयूआयडी नंतर बिलावर टाकण्याची आता गरज नाही. सेंटरमध्ये आलेल्या दागिन्यांमधून केवळ एका दागिन्याचे मशीनद्वारे हॉलमार्किंग व एचयूआयडी करता येईल. पीयूष गोयल यांनी प्रथम आलेल्यांना हॉलमार्कची सोय उपलब्ध करून दिल्याने छोट्या सराफांची समस्या सुटली आहे. तर दागिन्यांच्या शुद्धतेची समस्या तीन दिवसात निकाली काढण्यात येणार आहे. सध्या भारतात दरदिवशी एक लाख दागिने हॉलमार्क होतात, पण आता सर्व्हरची क्षमता चार लाखावर नेण्यात येणार आहे. बीआयएसने केलेली नोंदणी रद्द करण्याचा अधिकार बीआयएसला असू नये, तो न्यायालयाला द्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. याशिवाय खासगी सेंटरला दागिन्यांवर दुकानाचे नाव नोंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दागिन्यांवरील एचयूआयडी हटणार नाही, असे गोयल यांनी बैठकीत स्पष्ट केले.

जुन्या दागिन्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत हॉलमार्क करण्याची सुविधा

पूर्वी सराफांना जुने दागिने ३१ ऑगस्टपर्यंत हॉलमार्क करणे बंधनकारक होते, पण ही मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्थात आता या तारखेपर्यंत कोणत्याही सराफावर कारवाई होणार नाही. त्यामुळे कोरोना काळात न विकलेले दागिने आता ३० नोव्हेंबरपर्यंत विकण्याची मुभा सराफांना मिळाली आहे.

 

सेंटर उभारण्यासाठी एक कोटीची गुंतवणूक

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी खासगी हॉलमार्किंग सेंटर सुरू करण्याची परवानगी दिल्याने सराफांना दागिन्यांवर हॉलमार्क व एचयूआयडी क्रमांक टाकण्यासाठी १५ दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. सराफाला सेंटरसाठी एक कोटीची गुंतवणूक करावी लागेल. प्रक्रियेंतर्गत नागपुरात लवकरच जवळपास सात हॉलमार्क सेंटर उभे राहण्याची शक्यता आहे.

राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.

टॅग्स :Goldसोनं