शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

गोसेखुर्दसह विदर्भातील सात प्रकल्प लवकरच : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 1:45 AM

विदर्भाचे नशीब बदलवणारा गोसेखुर्द प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर गोसेखुर्दसह बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव, निम्न वर्धा, बेंबळा आणि निम्न पेढी प्रकल्प हे विदर्भातील सातही प्रकल्प २०१८ .......

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत महाराष्ट्रातील सिंचन दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाचे नशीब बदलवणारा गोसेखुर्द प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर गोसेखुर्दसह बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव, निम्न वर्धा, बेंबळा आणि निम्न पेढी प्रकल्प हे विदर्भातील सातही प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ३० हजार कोटी रुपयांच्या योजनेचे हे प्रकल्प असून यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भातील १० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री व अ‍ॅग्रो व्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.गडकरी पुढे म्हणाले, राज्यात फडणवीस सरकारने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. यातही जलयुक्त शिवार हे सर्वोत्कृष्ट असे काम आहे. सिंचनाच्या क्षेत्रात सरकार आणखी काम करीत आहे. केवळ विदर्भच नव्हे तर मराठवाडा व संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी महाराष्ट्रातील ३८५ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. २५ हजार कोटी रुपयांचा दमणगंगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच आणखीही काही प्रकल्प आहेत. आत्महत्यग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांच्या विकासासाठी १० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. उघडे कॅनलऐवजी आता पाईपद्वारे पाणी पोहोचवण्यास सुरुवात झाली असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील सिंचनाचे क्षेत्र २१ टक्के असून २०१९ पर्यंत दुप्पट वाढवून ४२ टक्केपर्यंत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपुरात मदर डेअरी सुरू केली. सध्या १ लाख ३० हजार लिटर दूध संकलित केले जात आहे. ज्या दिवशी २५ लाख लिटर दूध संकलित केले जाईल, त्यादिवशी शेतकºयांना आत्महत्या करावी लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भातही ऊस होऊ शकतो, हे आम्ही करून दाखविल्याचेही ते म्हणाले. रोजगारासाठी लोक शहरात येण्याऐवजी शहरातून लोक रोजगारासाठी गावांमध्ये जावे, हे आपले स्वप्न असल्याचेही गडकरी म्हणाले.