शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Samruddhi Mahamarg: मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’पेक्षा सातपट लांब; समृद्धी महामार्ग ठरणार ‘गेमचेंजर’

By कमलेश वानखेडे | Published: December 11, 2022 9:54 AM

या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे.  नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे.

- कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००२ साली १६०० कोटी रुपये खर्च करून ९४.५ किमीचा मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’ बांधण्यात आला होता. या मार्गामुळे मुंबई-पुण्याच्या एकूणच विकासात भर घातली. आता तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च करून ७०१ किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग साकार होत आहे.  हा मार्ग तब्बल १० जिल्हे व २६ तालुक्यांना जोडणार असून, हा मार्ग महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. 

या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे.  नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे.  विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी, नव उद्योजक, लहान उद्योजक, व्यापारी यांना त्यांच्या उद्योग, व्यवसायाच्या वाढीसाठी हा मार्ग एकप्रकारे वरदान ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांत जास्त खनिज संपदा  चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व आसपासच्या परिसरात आहे. मात्र, खनिजावर आधारित कारखानदारी एक हजार किलोमीटरवर आहे. दूरवरच्या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल पोहोचविणे आता सोयीचे होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतमाल लवकर मुंबईसारख्या मार्केट यार्डमध्ये पोहोचविणे शक्य होईल. 

पर्यटन फुलणार : हा  महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी आदी विविध पर्यटन स्थळांना जोडतो. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल.

राज्याची उपराजधानी नागपूर ते देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा हा मार्ग पूर्ण झाला असून, लोकार्पणाची नागपूरजवळील हिंगणा तालुक्यातील वायफळ येथे अशी जय्यत तयारी झाली आहे. (छाया : विशाल महाकाळकर)

एका एकरमध्ये उभारला मंडपधामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एका एकरात मंडप उभारला गेला आहे.  तेथे तीन हजार  लोकांची उपस्थिती राहणार आहे. धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील  ७३ किलोमीटर हद्दीतून हा समृद्धी महामार्ग गेला आहे. आसेगाव व शिवणी येथे २० किमी अंतरावर दोन टोल आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघातील  ग्रामस्थांना या कार्यक्रमाचे थेट  प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी आसेगाव सावळा फाटा परिसरात  एक एकरात मंडप उभारण्यात आला, तर  १६ बाय १२ ची डिजिटल स्क्रीन लावण्यात आली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस