लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंत्रालयात कुठलेच काम फुकट होत नाही, त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा लाभ हवा असेल तर, प्रत्येक कर्मचाºयाने वर्गणी जमा करावी, असा संदेश जि.प. कर्मचाºयांच्या व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नावाने असलेल्या या मॅसेजमुळे ही अवैध वसुली कशासाठी? असा सूर कर्मचाºयांमधून निघत आहे.सातव्या वेतन आयोगात एमपीडब्ल्यू व एचए वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी के. पी. बक्षी समिती स्थापन करण्यात आली. या समितीसोबत २३ आॅगस्ट २०१७ रोजी संघटनेच्या पदाधिकाºयांची मुंबई येथे बैठक सुद्धा झाली. या बैठकीत वेतन त्रुटीचा प्रस्ताव संघटनेने समितीकडे सादर केला आहे. परंतु जि. प. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नावावर व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या संदेशात संघटनेचे अध्यक्ष मधुकर सोनुने यांचे नाव आहे. मंत्रालयात कोणतेही काम फुकट होत नाही. त्यामुळे काम ताबडतोब होण्यासाठी सर्व जिल्ह्यातील कर्मचारी व पदाधिकाºयांनी ५०० ते १००० रुपये वर्गणी जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व जिल्ह्यांनी युद्धपातळीवर वेळेच्या आत वर्गणी जमा करून काम करून घेण्याची गरज आहे. अन्यथा पाचव्या, सहाव्या वेतन आयोगापासून जे लाखो रुपयांचे नुकसान झाले ते सातव्या वेतन आयोगातही एमपीडब्ल्यू, एच.ए. वर्गाचे होईल, असे सोनुने यांनी आपल्या मॅसेजमध्ये नमूद केले आहे. नियमबाह्य पैशाची मागणी करणारा व्हॉट्स अॅप वरील हा संदेश सध्या जि. प. मधील अनेक कर्मचारी व अधिकाºयांच्या मोबाईलमध्ये फिरत आहे. अशा रीतीने पैशाची मागणी करणे चुकीचेच असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष मधुकर सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुंबईला ये-जा करण्यासाठी पैसा वर्गणीच्या स्वरूपात आम्ही गोळा करतो. रीतसर वार्षिक वर्गणीही घेतो. परंतु, सध्या फिरत असलेला संदेश मी टाकला नसून, संघटनेच्या नावावर कुणीतरी खोडसाळपणा केला आहे.
सातवा वेतन आयोग हवाय, वर्गणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:12 AM
मंत्रालयात कुठलेच काम फुकट होत नाही, त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा लाभ हवा असेल तर, प्रत्येक कर्मचाºयाने वर्गणी जमा करावी, .....
ठळक मुद्देकर्मचाºयांकडून वसुली : संघटना अध्यक्षाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर मॅसेज