लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : कंत्राटदाराने सार्वजनिक मैदाने साैंदर्यीकरण व सुरक्षा भिंतीचे काम मध्येच थांबविले. या कामादरम्यान मैदानातून गेलेले गटार फुटले आणि त्यातील सांडपाणी मैदानासाेबतच लगतच्या रस्त्यावर वाहायला सुरुवात झाली. या पाण्याची दुर्गंधी व डासांच्या पैदासीमुळे वाडी शहरातील श्री सत्यसाई सोसायटी परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, त्यांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाडी नगर परिषद प्रशासनाने शहरातील दत्तवाडी भागात असलेल्या श्री सत्यसाई सोसायटी येथील सार्वजनिक मैदानाच्या साैंदर्यीकरण व त्याच्या सुरक्षा भिंतीच्या कामाला कंत्राटदारामार्फत चार महिन्यापूर्वी सुरुवात केली. कंत्राटदाराने ते काम दाेन महिन्यापूर्वी मध्येच बंद केले. सुरक्षा भिंतीसाठी आवश्यक असलेले काॅलम तयार करण्यासाठी खड्डे खाेदण्यात आले आणि या खाेदकामामुळे भूमिगत गटार फुटले. त्यामुळे गटारातील घाण सांडपाणी मैदानात साचत असून, लगतच्या रस्त्यावरून वाहात आहे.
या पाण्याची दुर्गंधी येत असल्याने साेयायटीतील नागरिकांनी कंत्राटदाराकडे गटार दुरुस्त करण्याची अनेकदा मागणी केली. त्याने लक्ष न दिल्याने नागरिकांनी हा प्रकार स्थानिक लाेकप्रतिनिधींच्याही निदर्शनास आणून दिला. मात्र, कुणीही ही समस्या साेडवायला तयार नाही, असे लक्षात येताच श्री सत्यसाई सोसायटी कृती समितीचे सदस्य व नागरिकांनी शुक्रवारी (दि. १६) वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना निवेदन देऊन यावर तातडीने उपाययाेजना करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात संतोष नरवाडे, मनीष मांगलकर, नीलेश पलांदूरकर, अनिल चौधरी, दिनेश पंत, किशोर बावणे, मनीष दादलानी यांच्यासह नागरिकांचा समावेश हाेता.
....
डेंग्यूची जबाबदारी घेणार काेण?
गटारातील घाण पाण्याच्या डबक्यांमुळे या भागात डासांची पैदास माेठ्या प्रमाणात हाेत आहे. सध्या पावसाळा असून, डेंग्यूसह अन्य कीटकजन्य आजार डाेके वर काढत आहे. श्री सत्यसाई साेयायटीतील नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, विषाणूजन्य ताप व तत्सम कीटकजन्य आजार झाल्यास त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्नही या साेसायटीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
160721\img-20210630-wa0191.jpg
फोटो