योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे बीज सेवाग्रामच्या भूमीतच रोवल्या गेले होते आणि त्यानंतर देशाने एक इतिहास घडताना पाहिला. आज देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. आज देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची आवश्यकता आहे. याच विचारांचा जागर आम्ही देशभरात करणार आहोत. सेवाग्राममधूनच देशासोबतच काँग्रेस पक्षालादेखील भविष्याची नवी दिशा मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. सेवाग्राम येथे गांधीजयंतीच्या मुहूर्तावर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची ऐतिहासिक बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.काँग्रेसने नेहमी महात्मा गांधी यांच्या विचारधारेला आदर्श मानून काम केले आहे. आज भाजपा व संघाचे लोक इतिहासातील तथ्यांवर आघात करून देशाला एका वेगळ््या वाटेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील सध्याचे चित्र पाहता देशातील एक महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करणे व समाजकारणाची पुढील दिशा ठरविणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळेच ‘संपुआ’च्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेस महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत चिंतन व मनन करणार आहे. यातूनच येणारे सार हे सर्वांना दिशादर्शक ठरणारे असेल, असे अशोक चव्हाण म्हणाले. महात्मा गांधी हे केवळ काँग्रेसचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. त्यांच्या विचारांचा जागर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राममधून याची सुरुवात करणे यासारखा दुसरा चांगला मुहूर्त राहूच शकत नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.हा निवडणुकांचा शंखनाद नाही२०१९ च्या निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात सेवाग्राममधून करण्यात येत असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. मात्र सेवाग्राम येथे चिंतन व मनन करण्याची आमची भूमिका राजकीय नाही. एक पक्ष म्हणून देशातील समाजकारणावर येथे चर्चा होणार आहे. महात्मा गांधी यांना नमन करण्यात येणार आहे. हा निवडणुकांचा शंखनाद आहे असे समजण्याचे काहीच कारण नाही. मात्र देशातील अराजकता, भय आणि एकाधिकारशाहीच्या वातावरणाविरोधात समाजाच्या साथीने होत असलेला शंखनाद नक्कीच ठरेल, अशी स्पष्टोक्ती अशोक चव्हाण यांनी केली.शांती व सद्भावनेवर चर्चा होणारराजकीय पातळीवर एक महत्त्वाचा विरोधी पक्ष म्हणून आमची सरकारविरोधात निश्चित भूमिका आहेच, मात्र सेवाग्राम येथील भूमीत राजकारण करणे योग्य होणार नाही. देशात शांती व सद्भावना प्रस्थावित यावी यासाठी त्यासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. सेवाग्रामच्या भूमीतून काँग्रेस नवीन ऊर्जा घेऊन देशभरात नव्या जोमाने कामाला लागेल, असा दावादेखील त्यांनी केला.
सेवाग्राममधून मिळेल देशाला नवी दिशा : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 1:07 AM
१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे बीज सेवाग्रामच्या भूमीतच रोवल्या गेले होते आणि त्यानंतर देशाने एक इतिहास घडताना पाहिला. आज देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. आज देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची आवश्यकता आहे. याच विचारांचा जागर आम्ही देशभरात करणार आहोत. सेवाग्राममधूनच देशासोबतच काँग्रेस पक्षालादेखील भविष्याची नवी दिशा मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. सेवाग्राम येथे गांधीजयंतीच्या मुहूर्तावर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची ऐतिहासिक बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
ठळक मुद्देगांधीविचारांचा जागर देशभरात करणार