नागपूर शहराची नॉर्थ (सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी), सेंट्रल (धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज) आणि साऊथ (लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर) या तीन झोनमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या तिन्ही झोनमधील सिवर लाईनच्या दुरुस्ती व देखभाल कार्यांतर्गत एकूण ६० किमीची पाईपलाईन बदलविण्यात येणार आहे.
परंतु हा प्रकल्प तूर्त कागदावरच आहे.
....
असा आहे सिवरेज आराखडा व खर्च
नॉर्थ झोन- १०.३५ कोटी
सेंट्रल झोन- ४.९८ कोटी
साऊथ झोन - १५.९५ कोटी
...
प्रकल्पातील कामे
- जुन्या सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्त करणे.
- २८.५६१ किमीच्या सिवरेज लाईंनची दुरुस्ती
- शहरातील दहा झोन तीन भागात विभाजन.
- सिवरेज व चेंबरवर झाकण टाकणे.
.....
निर्देशानंतरही कार्यवाही नाही
शहरातील अनेक वस्त्यात नादुरुस्त सिवरेज व चेबर दुरुस्तीची गरज आहे. याचा विचार करता ३१ कोटीच्या सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीच्या प्रकल्पाला मंजुरी देऊन निविदा काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. परंतु यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करणे प्रशासनाची जबाबदारी आहे.
विजय झलके, अध्यक्ष स्थायी समिती, मनपा