नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. दोन महिलाच या रॅकेटच्या सूत्रधार निघाल्या.
शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ऑरेंज नगर येथील प्लॉट क्रमांक ९७ येथे पोलिसांनी धाड टाकली. संबंधित ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली होती. पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून याची शहानिशा केली व खात्री पटताच कारवाई केली. घटनास्थळावरून दोन पिडीत महिला आढळल्या. त्यांच्याकडून पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करवून घेतल्या जात होता.
या अड्डा प्रिया (३०, पारडी) व ममता (४५, वाठोडा) यांच्याकडून चालविल्या जात होता. त्यांनी बऱ्याच तरुणींच्या गरिबीचा फायदा घेत त्यांना देहव्यापारात ओढले होते. दोन्ही महिलांविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात पिटा ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, सचिन बडिये, शेषराव राऊत, अजय पौनीकर, आरती चव्हाण, अश्विन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम, नितीन वासने, कमलेश क्षीरसागर, लता गवई व पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.