लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्कोका डॉट कॉम या वेबसाईटवरून देहविक्रयाचे ‘मायाजाल’ निर्माण करणाऱ्या दिल्लीत वास्तव्य असलेल्या छत्तीसगडमधील महिलेला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. माया ऊर्फ पूजा गोपाल राव (वय ३२) असे तिचे नाव आहे. ती भिलाई(छत्तीसगड)मधील मूळ रहिवासी असून, सध्या ती बजाजनगरात राहते.स्कोका डॉट कॉम या वेबसाईटवरून माया ग्राहकांना वेश्या पुरविते. त्यात तिचा मोबाईल नंबरही आहे. त्याची माहिती काढून पोलिसांनी मायाला अडकविण्यासाठी जाळे टाकले. तिच्याशी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी शुक्रवारी संपर्क साधला. तिने आतिश खडसे नामक दलालाशी संपर्क करण्यास सांगितले. आतिशने वारांगना उपलब्ध करून देण्याचे सांगून सदरमधील पूनम चेंबर्सजवळ ग्राहकाला बोलविले. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी ग्राहक आणि त्याच्या आजूबाजूला पोलीस पोहचले. पंधराशे रुपये स्वीकारून वेश्याव्यवसाय करणारी तरुणी ग्राहकाच्या हवाली करताच पोलिसांनी आतिशला ताब्यात घेतले. माया मात्र फरार झाली. शोधाशोध करून पोलिसांनी तिला शनिवारी सकाळी नीलकमल सोसायटी, बजाजनगर येथील सदनिकेतून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, फौजदार दामोदर राजूरकर, सुभाष खेडकर, हवालदार विजय गायकवाड, शीतलाप्रसाद मिश्रा, मुकुंद गारमोडे, प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छाया राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, सामाजिक कार्यकर्त्या निशा मोरे, विजयाराणी रेड्डी आदींनी ही कामगिरी बजावली.विमानाने प्रवास, महागड्या हॉटेलमध्ये व्यवस्थामाया रावचे मायाजाल महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली अन् छत्तीसगडमध्ये असल्याचे पोलीस सांगतात. ती स्वत:च प्रारंभी चेन्नईत वेश्याव्यवसाय करायची. आता ती विविध प्रांतातील हायप्रोफाईल वारांगनांकडून वेश्याव्यवसाय करवून घेते. शुक्रवारी पोलिसांनी पकडलेली वारांगना दिल्लीची आहे. ती १५ नोव्हेंबरला विमानाने नागपुरात आली. हरदेवमध्ये तिची व्यवस्था होती. माया तिला पाच हजार रुपये रोज देत होती. ग्राहकाकडून ती एका नाईटचे २० ते ३० हजार रुपये घ्यायची तर, दिवसा एका वेळेला १५०० रुपये घ्यायची. मायाचे ठिकठिकाणी एजंटही आहेत. नागपुरात ती दीड वर्षांपासून हा व्यवसाय चालवते. तिने गोरेवाडा, गिट्टीखदानमधील आतिश रामेश्वर खडसे (वय ३८, रा. गोरेवाडा) याच्या माध्यमातून हा गोरखधंदा चालविला होता.