लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : लैंगिक अत्याचार प्रकरणात २२ दिवसांपासून फरार असलेल्या आराेपीला देवलापार (ता. रामटेक) पाेलिसांनी साकाेली (जिल्हा भंडारा) येथून शनिवारी (दि. २६) रात्री १० वाजताच्या सुमारास ताब्यात घेत अटक केली. त्याला रविवारी (दि. २७) नागपूर शहरातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावल्याची माहिती उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर यांनी दिली.
वैभव कैलास राऊत (२३, नवेगाव-चिचदा, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याने त्याच्या वर्ग मैत्रिणीसाेबत प्रेमसंबंध निर्माण करीत तिच्याशी लग्न करण्याची बतावणी केली आणि तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. यासाठी त्याने वेगवेगळे हाॅटेल्स, रिसाॅर्ट, लाॅजचा वापर केल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले. त्याने ८ ऑगस्ट २०२० राेजी देवलापार परिसरातील रिसाॅर्टमध्ये तिला गुंगीचे औषध दिले. तिथे तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याची आक्षेपार्ह चित्रफित तयार केली व फाेटाेही काढले हाेते.
वारंवार विनंती करूनही ताे तिच्याशी लग्न करण्यास तयार नसल्याने पीडित तरुणीने त्याच्याविराेधात पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ताे फरार असल्याने पाेलीस त्याचा शाेध घेत असताना ताे साकाेली येथे असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी लगेच त्याला साकाेलीतून ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, सतीश नागपुरे, गजानन जाधव यांच्या पथकाने केली.
...
अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
वैभवचे वडील बाेथिया-पालाेरा भागाचे लाेकप्रतिनिधी आहेत. गुन्हा दाखल हाेताच ता. या भागातून ५ जून राेजी पळून गेला हाेता. याच काळात त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात दाेनदा अर्ज केले हाेते. मात्र, न्यायालयाने दाेन्ही अर्ज फेटाळले हाेते. शिवाय, प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबवाचाही वापर करण्यात आला. गुन्हा दाखल हाेण्यापूर्वी देवलापार पाेलिसांनी त्याची समजूत काढून तिच्याशी लग्न करण्याची सूचनाही केली हाेती. ता. तरुणीला लग्न करण्यासाठी विवाह नाेंदणी कार्यालयात बाेलवायचा आणि स्वत: गैरहजर राहायचा. शिवाय, तिला आक्षेपार्ह शिवीगाळ करायचा.