शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

नागपुरातील गॅगस्टर आंबेकरकडून लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 8:38 PM

बदनामीचा धाक, मारण्याची धमकी आणि पैशाचे प्रलोभन देऊन एका २३ वर्षीय तरुणीचे गॅगस्टर संतोष आंबेकरने आठ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

ठळक मुद्देशाळेत असतानापासूनच छळ : बदनामीचा धाक, मारण्याची धमकी चार वर्षांत नागपूर, मुंबई, बंगळुरूसह अनेक ठिकाणी बलात्कार : लकडगंजमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदनामीचा धाक, मारण्याची धमकी आणि पैशाचे प्रलोभन देऊन एका २३ वर्षीय तरुणीचे गॅगस्टर संतोष आंबेकरने आठ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत पीडित तरुणीने संपर्क साधून तक्रार दिली. त्यात ती १५ वर्षांची असतानाच संतोषने तिचे लैंगिक शोषण केल्याचे नमूद केले आहे. या धक्कादायक घडामोडीमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, लकडगंज पोलीस ठाण्यात संतोषविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार विनयभंग करणे, बलात्कार करणे आणि धमकी देण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.कुख्यात संतोष सध्या ५० वर्षांचा आहे. तर, तक्रार करणारी तरुणी २३ वर्षांची आहे. ती लकडगंजमध्ये राहते. संतोषच्या घराजवळ असलेल्या शाळेत आठ वर्षांपूर्वी (१५ वर्षांची असताना) ती शाळेत जात येत असताना संतोष तिला थांबवायचा आणि विचित्र इशारे करून बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर तो तिच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क करून तिला स्वत:सोबत बोलायला भाग पाडत होता. यावेळी तो तिच्यासोबत लज्जास्पद भाषेत बोलायचा. ती १९ वर्षांची झाल्यानंतर (सन २०१५ मध्ये) तो तिला स्वत:च्या इतवारीतील घरी, घरासमोर असलेल्या ऑफिसमध्ये बोलवायचा. वेगवेगळे बहाणे करून तिला कधी मुंबईतील घाटकोपरमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये तर कधी बंगळुरूमधील अमन वन या रिसोर्टमध्ये नेऊन त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. कधी बदनामीचा धाक दाखवायचा तर कधी कुणाला काही सांगितल्यास तुला सोडणार नाही, म्हणून धमकी द्यायचा. तिला भेटवस्तू आणि पैशाचे प्रलोभन दाखवून २०१५ पासून ११ ऑक्टोबरपर्यंत संतोषने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले. त्याची तात्काळ दखल घेत वरिष्ठांनी शुक्रवारी रात्री लकडगंज ठाण्यात संतोषविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार विनयभंग करणे, बलात्कार करणे आणि धमकी देण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.पोलिसांनी डॉनला घेरलेसंतोष आंबेकर नागपूरच नव्हे तर विदर्भातील गुन्हेगारांचा मास्टर माईंड समजला जातो. संतोषला नागपूर-विदर्भातील गुन्हेगार डॉन म्हणतात. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचे कटकारस्थान, अपहरण, खंडणी वसुली, जागा बळकावणे, फसवणूक करणे, धमक्या देणे, आदी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दहशत निर्माण करून संतोषने कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे. महिन्याला लाखोंची खंडणी येत असल्याने त्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. पैशाचा आणि दहशतीचा वापर करून तो त्याच्याविरुद्ध बोलणाऱ्यांचे तोंड बंद करीत होता.पहिल्यांदाच ठोस कारवाईअनेक पोलिसांसोबत मधूर संबंध निर्माण करणाऱ्या संतोषने मध्यंतरी राजकीय आश्रयही मिळवला होता. त्यामुळे पोलीस त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई करीत नव्हते. मात्र पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नागपुरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना खुली सुट दिली. गुन्हे शाखेची धुरा कर्तव्यकठोर अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या हाती दिली. त्याचमुळे संतोष आंबेकरसारख्या कुख्यात गुंडाची भर चौकातून पायी वरात काढण्याची हिंमत पोलीस दाखवत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार