शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लग्नास नकार दिल्याने शबनमची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:27 AM

लग्न करण्यास नकार दिल्यामुळे शबनम खानची हत्या करण्यात आली. शबनमची हत्या करणारा आरोपी स्कूल बस चालक सोनू शेख याने ही बाब कबूल केली.

ठळक मुद्देआरोपी मित्राला अटक : १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्न करण्यास नकार दिल्यामुळे शबनम खानची हत्या करण्यात आली. शबनमची हत्या करणारा आरोपी स्कूल बस चालक सोनू शेख याने ही बाब कबूल केली.गिट्टीखदान पोलिसांनी सोनूला त्याच्या गोंदिया येथील काकाच्या घरून अटक केली. त्याने ११ जून रोजी रात्री ८.३० वाजता काटोल रोडवरील दाभा स्थित जगदीशनगर येथे २३ वर्षीय शबनमची हत्या केली होती. पोलिसांना १२ जून रोजी दुपारी याबाबत माहिती मिळाली. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर सोनुच्या नातेवाईकांनी तिची सोनूसोबत मैत्री असल्याचे सांगितले होते. घटनास्थळापासून थोड्यात अंतरावर सोनूचे घर असल्याने पोलीस त्याच्या घरी गेले. परंतु तो अगोदरच फरार झाला होता.सूत्रानुसार सोनूची गेल्या सहा महिन्यांपासून शबनमसोबत मैत्री आहे. सोनूचे म्हणणे आहे की, तो शबनमवर प्रेम करु लागला होता. त्याने शबनमकडे लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. परंतु शबनमने नकार दिला होता. सोनू लग्न करण्यास योग्य नसल्याचे तिला वाटत होते. त्यमुळे तिने लग्नास नकार दिला होता. यावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होता. शबनमने याबाब आपल्या बहिणीलाही सांगितले होते. शबनमने लग्नास नकार दिल्यापासून सोनू अतिशय रागात होता. तो शबनमला अद्दल घडविण्याच्या तयारीत होता. ११ जून रोजीे रात्री ७.३० वाजता नेहमीप्रमाणे शबनम ड्युटीवर जाण्यासाठी घरून निघाली. ती गिट्टीखदान येथील एका क्लिनीकमध्ये काम करीत होती. सोनूला याची माहिती होती. सोनू तिला बोलण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवून घटनास्थळी घेऊन आला. तिथे पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. सोनूच्या म्हणण्याुसर शबनम त्याला शिवीगाळ करू लागली. यामुळे त्याला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात त्याने तिच्याच्या ओढणीने तिचा गळा आवळला. ती जिवंत असेल या शंकेने पोटात चाकू खुपसून फरार झाला.सोनू हा बस चालक आहे. या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कुणीही नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. एपीआय एस.एस. गजा यंनी सोनुला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. तेथून त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले.खरे कारण लपविले जात असल्याचा संशयसोनू हत्या केल्याची कबुली देत असला तरी तो खरे कारण लपवित असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस शबमच्या कुटुंबीयांचीही विचारपूस करणार आहे. शबनमचे वडील रिक्षा चालवतात. घर चालवण्यासाठी शबनमच्या बहिणीही काम करतात. याबाबत सोनूला माहिती असल्याने तो चुकीच्या कामासाठी शबनमला त्रास तर देत असल्याची शंका नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर