लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदित प्रतिभावंत कलाकार समीक्षा एक आर्टिस्ट, कॅलिग्राफर, डिझायनर, उद्योजक असण्यासोबतच बुटीक आर्ट स्टुडिओ ‘शेड्स’ची संस्थापक आहे. या स्टुडिओची निर्मिती त्यांनी कलेप्रति आपले प्रेम, आसक्ती आणि ओढ व्यक्त करण्यासाठी केली आहे. प्रकल्प म्हणून सुरू झालेले हे रचनात्मक आऊटलेट आता त्यांच्या करिअरला पथदर्शक ठरलेले आहे. ‘शेड्स’च्या माध्यमातून समीक्षा हाताने बनविलेल्या कलाकृतीमध्ये दडलेले प्रेम, आनंद आणि स्तुतीला प्राप्त करण्याचे प्रयत्न करत असते.
ब्रिटन येथून इंटिरिअर आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईनचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर समीक्षाने नोकरी केली. परंतु, ती आपले भविष्य आयुष्यर याच मर्यादेत कोंडू पाहत नव्हती. आनंद व्यक्त करण्याची कल्पना यातून साध्य होत नव्हती. कशात सर्वात जास्त आनंद मिळणार, याची जाणिव मनाला होती. हा आनंद त्यांना कला जगताची ओळख करण्यातून आणि कला निर्माणातून प्राप्त झाला. ‘शेड्स’सोबत त्यांनी आपल्या कलायात्रेस प्रारंभ केला आणि पूर्णवेळ कलावंत म्हणून त्यांनी आपल्या भविष्याची घडवणूक केली. तुम्हाला जे काम सर्वोत्कृष्टरीत्या करता येते, तुम्हाला ज्याचा सर्वात जास्त परिचय आहे, त्याच कामाला सर्वात जास्त वेळ द्या, असे एकदा समीक्षाने म्हटले होते.
........