लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणसांमधील माणुसकी माणुसकीनेच जपली जावी अन् आपापसातील आत्मीयता आपुलकीने टिकावी, हा उद्देश समोर ठेवून समाजऋण जपणाºया व्यक्ती आजही समाजात आहेत. हीच माणुसकी वंचित, गोरगरिबांच्या आयुष्याचा आधार ठरली आहे. समाजऋणाचा हा वारसा पुढेही सुरू राहावा या उद्देशाने रामनगरातील बळवंतराव उमाळकर आणि सुषमा उमाळकर या दाम्पत्याने मदतीचा हात पुढे केला आहे. लाख-दोन लाखांची नव्हे तर तब्बल ५० लाख रुपयांची देणगी या दाम्पत्याने सामाजिक संस्थांसाठी देऊन आदर्श निर्माण केला आहे.गरजूंसाठी मदतीचा आधार ठरलेल्या अनेक संस्था सामाजिक सेवेचा वसा जपून आहेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता सेवारत असणाºया अशा संस्थांना या दाम्पत्याने ही मदत दिली आहे. त्यात शेगावातील श्री संत गजानन महाराज संस्थान, स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था संचालित एकलव्य एकल विद्यालय, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, खापरी नागपूर, शेतकरी संघटना, आंबेठाण येथील शेतकरी ट्रेनिंग सेंटर आणि अमरावती येथील डॉ. अविनाश सावजी संचालित प्रयास या संस्थांचा समावेश असून, घटस्थापनेच्या दिवशी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या देणगीचे वितरण या संस्थांना करण्यात आले.बळवंतराव उमाळकर सध्या नागपुरात राहतात. ते मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रचंड मेहनतीने त्यांनी शेती व्यवसायात लौकिक मिळविला.ते अंकुर सीडस् प्रा.लि. कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही गेली ४० वर्षे ते या कंपनीचा आर्थिक व प्रशासकीय कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. गडकरी यांनी उमाळकर परिवाराचे कौतुक करीत असे उदाहरण समाजाला प्रेरणा देत असतात, असे मनोगत व्यक्त केले.सीए दिलीप रोडी यांनी प्रास्ताविकातून उमाळकर कुटुंबीयांच्या दातृत्वाचा गौरव केला. याप्रसंगी आमदार परिणय फुके, नगरसेविका परिणिता फुके, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, सरोज काशीकर, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, प्रयासचे डॉ. अविनाश सावजी, स्व. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था एकलव्य एकल विद्यालयाचे राजीव हडप व प्रशांत बोपर्डीकर तसेच अंकुर सीडस्चे प्रबंध संचालक माधवराव शेंबेकर, मकरंद सावजी (विपणन संचालक), अॅडव्हिजनचे रवींद्र कासखेडीकर, विजय व विशाल उमाळकर तसेच चंदन काशीकर व जयंत व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
वंचितांच्या डोक्यावर धरली दातृत्वाची सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:44 AM
माणसांमधील माणुसकी माणुसकीनेच जपली जावी अन् आपापसातील आत्मीयता आपुलकीने टिकावी, हा उद्देश समोर ठेवून समाजऋण जपणाºया व्यक्ती आजही समाजात आहेत.
ठळक मुद्देउमाळकर दाम्पत्याचे औदार्य आरोग्य, शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थांना दिली ५० लाखांची देणगी