पोद्दारेश्वर राम मंदिराच्यावतीने सुवर्ण जयंतीनिमित्त मुख्य रथाला आकर्षक रोषणाई करण्यात आली. याप्रसंगी हा दिव्य रथ व्हेरायटी चौकात आला तेव्हा आकर्षक विद्युत रोषणाईने रथ झगमगून गेला होता. यावेळी रथावरील रोषणाई पाहून उपस्थितांचे डोळे दिपले. यावर विराजमान प्रभू रामचंद्रांची प्रसन्न मूर्ती उपस्थितांच्या कुतूहलाचा विषय झाली.अनेकांचे या झगमगणाऱ्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि या रथाचे छायाचित्र काढून घेण्यासाठी हातातले मोबाईल सरसावले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी शोभायात्रेत सर्वाधिक म्हणजे तब्बल ८० नेत्रदीपक चित्ररथांचा सहभाग होता. प्रत्येक चित्ररथ पौराणिक कथांवर आधारित होता. आकर्षक विद्युत रोषणाईने चित्ररथ लखलखत होते.
झगमगणारे रामलला
By admin | Published: April 16, 2016 2:25 AM