मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात देशातील सर्व राज्यांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या सीमा बंद करून या कायद्याचा निषेध व्यक्त करीत आहेत. शेतकरी संघटना किसान मंच यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून शंकर अण्णा गोडसे, संगीताताई मोडक-अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी, महाराष्ट्राचे निमंत्रक खेमराज कोर, हरियाणाचे हरपाल सिंग, संतोष सोळंकी, घनसिंग सारावत, लक्ष्मण वंगे या सर्व सहकाऱ्यांसोबत शंकर अण्णा गोडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय किसान मंचचे प्रमुख राकेश टिकैत यांचा हरियाणी पगडी घालून सिंघू बॉर्डरवर सत्कार केला. राष्ट्रीय किसान मंचच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात सदैव शेवटपर्यंत पाठीशी राहतील अशी ग्वाही सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली.
फोटो- गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत व चौ. युध्द वीर सिंह यांच्यासोबत चर्चा करताना खेमराज कोर, धनसिंह सरावत, जरनैल सिंह व इतर.
===Photopath===
090221\09ngp_58_09022021_2.jpg
===Caption===
फोटो- गाजीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत व चौ. युध्द वीर सिंह यांच्यासोबत चर्चा करताना खेमराज कोर, धनसिंह सरावत, जरनैल सिंह व इतर.