लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक, कृषितज्ज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. २२ डिसेंबरला तुमसर (जि. भंडारा) तालुक्यातील राजापूर येथे हे संमेलन होणार आहे.राष्ट्रसंतांचे साहित्य विविधांगी आहे. साहित्याचे सर्व प्रकार राष्ट्रसंतांच्या साहित्यात आढळतात. त्यावर चिंतन व मंथन होण्यासाठी हे विचार साहित्य संमेलन घेतले जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. आजवर १८ राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे आयोजन लोकसहभागातून झाले आहे. त्यापैकी पाच संमेलने विद्यापीठस्तरावरून झाली आहेत.यावेळचे साहित्य संमेलन भंडारा जिल्हा तालुका तुमसर येथील राजापूर या लहानशा खेड्यात होत आहे. नाटक, तमाशा, दंडार या कला जोपासणारा भंडारा जिल्हा संतसाहित्याचाही अभ्यासक आहे. झाडीबोलीला सन्मान मिळावा म्हणून धडपडणारे डॉ. हरीशचंद्र बोरकरांनी ‘राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची शब्द श्रीमंती’ हा अभ्यासपूर्ण संशोधनात्मक ग्रंथ लिहिला.ज्ञानेश्वर रक्षक यांनी १९९५ ला पहिले राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन नागपूर जिल्ह्यातील येरला गावात घेतले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यिक-विचारवंत कसे आहेत, हे प्रस्थापितांना सांगणारे हे पहिले संमेलन होते.शरद निंबाळकर राष्ट्रसंतांच्या विचारांचे पाईकनवनियुक्त संमेलनाध्यक्ष डॉ. शरद निंबाळकर राष्ट्रसंतांच्या विचारांचे पाईक आहेत. बालपणी आईकडून शिकलेली राष्ट्रसंतांची भजने, सामुदायिक प्रार्थनेतून ते संस्कारित झाले आहेत.राष्ट्रसंतांचे साहित्य प्रचारकी असल्याची टीका त्यांच्याच हयातीत होत होती. विचारवंत-शिक्षित अभ्यासकांमध्येही तुकडोजी महाराज डफरी वाजवणारे संत होते, असा समज आहे. मात्र आज देशभर राष्ट्रसंतांच्या साहित्यावर संमेलनातून चर्चा घडत आहे. ही विद्वानांना चपराक आहे.-ज्ञानेश्वर रक्षक,प्रवर्तक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी शरद निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 10:26 PM