नागपूर: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव तसेच घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटातर्फे बुधवारी व्हेरायटी चौकात निदर्शने करीत नारेबाजी करण्यात आली. शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाचा निषेध नोंदविला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. एवढी वर्षे त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले व आता निवडणूक आयोग केंद्र सरकार व भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत असून पक्षाचे नाव व चिन्ह हिसकावण्याचे काम करीत असल्याचा आरोप यावेळी पेठे यांनी केला.
ग्रामीण अध्यक्ष राजु राऊत, वेदप्रकाश आर्य, अविनाश गोतमारे, प्रवीण कुंटे, जानबाजी मस्के, वर्षा शामकुले, पंकज ठाकरे, श्रीकांत घोगरे, रेखा कुपाले, संतोष सिंह, शिव भेंडे, महेंद्र भांगे, राविनिष पांडे, राजा बेग,अरशद सिद्दिकी, मोरेश्वर जाधव, राजू सिंग चव्हाण, प्रशांत बनकर, तनुज चौबे, , अश्विन जवेरी, सुनील लांजेवार, आशुतोष बेलेकर, रिजवान अंसारी, प्रकाश लिखाणकर, धनंजय देशमुख, नंदू माटे, राजा खान,विनोद कावळे, लीना पाटील, शेखर पाटील, नागेश वानखेडे, विनय मुदलियार,अर्चना वावू, संदीप डोरलीकर, अमित श्रीवास्तव, विजय गावंडे, अजहर पटेल संजय दापोळकर, सारंग साखरे, नितीन बाकडे, आकाश चिमणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.