शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
2
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
4
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
5
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
6
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
7
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
8
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
9
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
10
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
11
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
12
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
13
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
15
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
16
जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS
17
उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"
18
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन' सीन; त्यातही किंग कोहलीचा प्रॅक्टिस सेशनमधील फोटो लीक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : श्रीनिवास वनगा अन् एकनाथ शिंदेंमध्ये दिलजमाई; मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच दिला शब्द
20
“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे

शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी पण पटोले म्हणतात काँग्रेसला माहीतच नाही

By कमलेश वानखेडे | Published: August 31, 2022 6:01 PM

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत नाना पटोले यांची स्पष्टोक्ती

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी मिळून लढणार व यावर चर्चा सुरू आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले होते. पण याबाबत काँग्रेसला काहीच माहीत नाही, असे आश्चर्यकारक वक्तव्य नाना पटोले यांनी बुधवारी केले. ते शरद पवार यांचे मत आहे. काँग्रेस स्थानिक पातळीवरील नेत्यांशी बोलून याबाबतचा निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पटोले यांच्या परिवारात बुधवारी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महागाई वाढली आहे. गेल्या सात आठ वर्षांत मुठभर लोकं श्रीमंत झाली, गरीब आणखी गरीब व्हायला लागलाय. ही दरी निर्माण होण्याचे नेमके कारण काय. केंद्र सरकारने तरुण, शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत द्यायला पैसा नाही, आणि वेगवेगळ्या कामात खर्च केला जात आहे. राजकारण पाहूण सरकार निर्णय घेत आहे. या सरकारने मराठा तरुणांसाठी नोकरी बाबात जे धोरण स्वीकारलं, त्याला विरोध नाही. पण त्यासाठी वेगळा निधी देण्याची मागणी त्यांनी केली. गोहाटीत काय तमाशा झाला हे माहित आहे. हे नेते सत्ता एन्जॅाय करीत आहे. प्रदुषण कोणी केलं हे जनतेला माहित आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

राज्यात काँग्रेसच मोठा पक्ष राहणार

मधल्या काळात डोकी फिरवून काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न केला गेला. पण महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष होता आणि राहणार, असेही पटोले यांनी ठासून सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी