आॅनलाईन लोकमतनागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात आज, मंगळवार १२ डिसेंबर रोजी काढण्यात येणाºया जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे व्हीलचेअरवर येणार आहेत. पवार यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर चार दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असून, डॉक्टरांनी त्यांना चालण्यास मनाई केली आहे. मात्र, व्याधीची पर्वा न करता पवार व्हीलचेअरवर बसून मोर्चात सहभागी होणार आहेत.पवार यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया झाली. रोज बॅण्डेज बदलावे लागते. डॉक्टरांनी चालण्यास सक्त मनाई करीत मोर्चात सहभागी न होण्याचा सल्ला दिला. यावर पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हा मोर्चा होत आहे. यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मोर्चाची तयारी झाली आहे. मी सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.अशात मी अंगठा घेऊन बसणे योग्य होणार नाही. माझी व्याधी क्षणिक आहे. व्हीलचेअरवर बसून का होईना पण मी मोर्चात सहभागी होईल, असे डॉक्टरांना सांगत पवार भावनिक झाले. पवार सकाळी विशेष विमानाने नागपुरात येतील तेव्हा त्यांच्यासोबत डॉक्टरही असतील. टी-पॉर्इंटवर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होणार आहे. या मंचावर पवार व्हीलचेअरवर बसून सहभागी होतील.
आज जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चात शरद पवार येणार व्हीलचेअरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 9:53 AM
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात आज, मंगळवार १२ डिसेंबर रोजी काढण्यात येणाºया जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे व्हीलचेअरवर येणार आहेत.
ठळक मुद्देपायाच्या अंगठ्यावर झाली शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या मनाईनंतरही सहभागी