शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात फेसबुकवर फोटो शेअर करणे महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:55 AM

मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले.

ठळक मुद्देपैशाच्या लोभात मित्राने रचला अपहरणाचा कट : मोठा अनर्थ टळला, तीन आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले. पोलिसांना संशय आल्यामुळे एक मोठा गुन्हा टळला. नीरज देवराव वर्मा असे अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बारावीचा विद्यार्थी असून, तो विद्यानगरात राहतो. त्याचा एक मित्र गोव्याला कॅसिनो चालवितो. तू मला एक लाख रुपये दिल्यास मी तुला महिन्याला ३० हजार रुपयांचा फायदा करून देईल, असे नीरजला गोव्याच्या मित्राने सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून नीरजने त्याला ती रक्कम दिली. त्याने नीरजला किती रक्कम दिली ते कळायला मार्ग नाही. मात्र, नीरजने त्याच्या मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी तिला आपल्याकडे महिन्याला बक्कळ रक्कम येत असल्याचे सांगितले. तिला विश्वास पटावा म्हणून त्याने तसे फोटोही शेअर केले. ही माहिती नीरजचा एक मित्र अनमोल बाबूलाल डोंगरे (वय २३, रा. मानेवाडा) याला कळली. नीरज काहीतरी मोेठे काम करीत आहे आणि त्याच्याकडे महिन्याला हजारोंची रोकड येत असल्याचा आरोपी अनमोलचा गैरसमज झाला. त्यामुळे त्याचे मित्रांकरवी अपहरण करून लाखोंची रोकड उकळण्याचा कट अनमोलने रचला. त्यानुसार, अनमोलने नीरजला शुक्रवारी दुपारी ३ वाजता फोन करून रामदासपेठमध्ये बोलवून घेतले. नीरज त्याच्या तीन मित्रांसह तेथे आला. आरोपी अनमोलने ठरवून ठेवल्याप्रमाणे तेथे आरोपी किशोर बबनराव चुनटकर (वय ४२, रा. म्हाडा कॉलनी दवलामेटी, वाडी) आणि शहजाद खान हबीब खान (वय ४१, रा. हफीज बेकरी मागे, मोमीनपुरा) पोहचले. आम्ही पोलीसवाले आहोत, तू गैरकायदेशीर काम करतो, असे म्हणत किशोर आणि शहजादने जबरदस्तीने आपल्या वाहनात कोंबले. त्याला वाडी परिसरात निर्जन ठिकाणी नेले. तेथे ते नीरजला मारहाण करीत असतानाच त्या भागात गस्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे धाव घेतली. चौकशीत हा अपहरणाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.मात्र, तो धंतोलीतून सुरू झाल्याने वाडी पोलिसांनी धंतोली पोलिसांना कळविले. ठाणेदार विजय आकोत यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.लालसा भोवली!मित्राच्या अपहरणाचा कट रचणारा आरोपी अनमोल हा मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह आहे. दिवाळीत झटक्यात लाखो रुपये मिळतील, या लालसेपोटी त्याने अपहरणाचा कट रचला. त्यात आणखी दोघांना सहभागी करून घेतले. मात्र, वेळीच तेथे पोलीस पोहचल्याने त्याचा कट उधळला गेला अन् अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यात त्याला ऐन दिवाळीच्या दिवसात पोलीस कोठडीत जावे लागले.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुकnagpurनागपूर