आॅनलाईन लोकमतनागपूर : आॅटोने जात असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत दिवसाढवळ्या सदर परिसरात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्यासोबत गंभीर घटना घडु शकते या भीतीने या मुलीने धावत्या आॅटोतून उडी घेऊन त्यातून आपली सुटका करवून घेतली. या घटनेमुळे मुलीचे कुटुंबीय दहशतीत आहेत.पीडित १७ वर्षीय मुलगी ११ वीची विद्यार्थिनी आहे. ती गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिची मावशी महालमध्ये राहते. ती सोमवारी मावशीकडे गेली होती. तेथे काही वेळ थांबल्यानंतर ती परतली. मावशीच्या कुटुंबीयांनी तिला दुपारी १२.४५ वाजता अग्रसेन चौकात एका आॅटोत बसवून दिले. ती एकटी असल्याचे पाहुुन आॅटोचालकाची नियत बिघडली. तो तिला घेऊन एलआयसी चौकातून रेसिडेन्सी मार्गावर पोहोचला. आॅटो रेसिडेन्सी मार्गाच्या एका गल्लीत घेऊन गेला. तेथे संधी साधून तो अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिच्याशी बळजबरी करु लागला. विरोध केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने जोरात आवाज केल्यास धोका होऊ शकतो याचा अंदाज आल्यामुळे त्याने आॅटो पुढे नेला. तो या अल्पवयीन मुलीला काटोल मार्गावर घेऊन जात होता. अंजुमन कॉलेजजवळ आॅटोचा वेग कमी झाल्यानंतर या मुलीने धावत्या आॅटोतून उडी मारली. हे पाहून आॅटोचालक फरार झाला. विद्यार्थिनीने मावशीच्या कुटुंबीयांना ही घटना सांगितली. ते त्वरित अंजुमन कॉलेजजवळ पोहोचले आणि तिलाा घेऊन त्यांनी सदर पोलीस ठाणे गाठले. तेथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानी आणि अल्पवयीन मुलीच्या शोषणाचा प्रयत्न केल्याबद्दल (पोक्सो) गुन्हा दाखल केला.
‘तिने’ छेडखानीचा विरोध करीत धावत्या आॅटोरिक्षातून घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:19 AM
आॅटोने जात असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत दिवसाढवळ्या सदर परिसरात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्यासोबत गंभीर घटना घडु शकते या भीतीने या मुलीने धावत्या आॅटोतून उडी घेऊन त्यातून आपली सुटका करवून घेतली.
ठळक मुद्देनागपूरच्या सदर भागातील थरार