ती माझी आई नाही : मुलीचा जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:33 PM2019-02-18T23:33:06+5:302019-02-18T23:33:45+5:30
एका महिलेने अल्पवयीन मुलीचा ताबा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ती महिला स्वत:ला त्या मुलीची आई म्हणवत आहे. परंतु, या प्रकरणात सोमवारी आश्चर्यकारक प्रकार घडला. संबंधित मुलीने ती महिला तिची आई नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच, आपल्या आई-वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका महिलेने अल्पवयीन मुलीचा ताबा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ती महिला स्वत:ला त्या मुलीची आई म्हणवत आहे. परंतु, या प्रकरणात सोमवारी आश्चर्यकारक प्रकार घडला. संबंधित मुलीने ती महिला तिची आई नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच, आपल्या आई-वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली.
संबंधित मुलगी देहव्यापारात लिप्त असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्या मुलीला वणी, जि. यवतमाळ येथून ताब्यात घेऊन नागपुरातील करुणा शेल्टर होममध्ये ठेवले आहे. त्या मुलीला सोमवारी न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले होते. तसेच, तिची आईही न्यायालयात हजर होती. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणातील ही परिस्थिती पाहता, अन्य मुद्दे विचारात घेण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्ती महिला मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. संबंधित मुलीला बबिता नावाच्या नातेवाईक महिलेने वणी येथे आणले होते. तिला रेखा नावाच्या महिलेकडे ठेवण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी देहव्यापाराच्या संशयावरून रेखाच्या घरी धाड टाकली. अधिक विचारपूस केल्यानंतर मुलीचे वय १६ वर्षे असल्याची माहिती पुढे आली. परिणामी, मुलीला सरकारी आश्रयगृहात ठेवण्यात आले.