नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कार करतानाची व्हिडीओ क्लीप तयार करून ती क्लीप व्हायरल करण्याचा धाक दाखवून वारंवार बलात्कार करवून घेणाऱ्या महिलेला उपरती झाली. तिची तक्रार खोटी आहे, हे चौकशीतून पोलिसांच्या आधीच लक्षात आले होते. मात्र, पुढे कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू नये म्हणून पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली अन् सामूहिक बलात्काराचा आरोप लावणाऱ्या महिलेचे कोर्टात कलम १६४ अन्वये बयान नोंदवून घेतले. यावेळी आरोप लावणाºया महिलेने बलात्कार झालाच नाही, आपण दबावात येऊन तक्रार नोंदवली होती, असे कोर्टापुढे सांगितले अन् सामूहिक बलात्काराच्या आरोपात नाहक गोवले गेलेल्या छोटे बाबा तसेच बंटी श्रीवास या युवकांची सुटका झाली.लोकमतने लावून धरल्यामुळे सर्वत्र चर्चेला आलेल्या या प्रकरणाची माहिती अशी, २४ डिसेंबर २०१८ ला गणेशपेठ पोलिसांकडे एका नवविवाहितेने छोटे बाबा आणि बंटी श्रीवासविरुद्ध तक्रार नोंदवली. कचोरीतून (नाश्त्यातून) गुंगीचे औषध खाऊ घालून या दोघांनी बलात्कार केला. त्याची मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत तयार केली, ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन हे दोघे आणि त्यांचे पाच ते सहा मित्र तीन महिन्यांपासून सामूहिक बलात्कार करीत असल्याचे या महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. महिला-मुली संरक्षण कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशपेठ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून छोटे आणि बंटीला अटक केली. त्यांचा पीसीआर मिळवला. पीसीआरदरम्यान कसून चौकशी करूनही छोटे बाबा अन् बंटीकडून गुन्ह्याची कबुली किंवा बलात्कार झाल्याचे अधोरेखित करणारा कसलाही पुरावा मिळाला नाही. त्याचदरम्यान तक्रारदार महिला, तिचा पती वारंवार विसंगत माहिती देत असल्याने पोलिसांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली. असे काही घडलेच नाही, हे तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी तक्रारदार महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तोपर्यंत ते छोटे आणि बंटी न्यायालयीन कस्टडीत पोहचले. तपास अधिकारी कुंडेकार यांनी हा प्रकार पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या लक्षात आणून दिला. दोन युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मागावर असल्याचे लक्षात आल्याने उपायुक्त माकणीकर यांनी तक्रारदार महिलेची पुन्हा विचारपूस केली.महिलेलाही उपरती झाली आपण फार मोठी चूक केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने खोटी तक्रार नोंदविल्याची कबुली दिली. उपायुक्त माकणीकर यांनी समाजसेवी महिलांच्या माध्यमातून तिचे समुपदेशन केले. त्यानंतर महिलेने कोर्टात बयान नोंदविताना ‘पतीच्या दडपणात येऊन आपण छोटे बाबा अणि बंटी श्रीवास विरुद्ध खोटी तक्रार नोंदवली. बलात्कार झालाच नाही’ असे तिने नमूद केले. त्यामुळे आरोपी म्हणून कारागृहात पोहचलेल्या छोटे आणि बंटी तसेच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणाºया पोलिसांचाही मार्ग मोकळा झाला. उपायुक्त माकणीकर यांनी लगेच विधी अधिकारी आणि तपास अधिकाºयांकडून ‘फॉल्स कम्प्लेंटचे बी फायनल’ तयार करून घेतले. ते कोर्टात सादर केल्याने हे प्रकरण निकाली निघाले. अर्थात छोटे बाबा आणि बंटी श्रीवास निर्दोष असल्याने त्यांची या केसमधून मुक्तता झाली. सध्या ते रोजंदारीवर काम करून कुटुंबीयांची उपजीविका भागविण्यास मदत करीत आहेत.सोशल मीडियावर धूमलोकमतच्या वृत्त मालिकेमुळे सर्वत्र चर्चेला आलेल्या या बोगस सामूहिक बलात्कार प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावरही चांगलीच धूम मचवली आहे. व्हॉटस्अॅपच्या माध्यमाने लोकमतचे या प्रकरणाच्या वृत्याचे कात्रण अनेक समूहांमध्ये (ग्रुप) चर्चेला आले आहे. त्यावर संतापजनक आणि भावनिक प्रतिक्रियाही नोंदविल्या जात आहेत. सामूहिक बलात्कारासारख्या गुन्ह्याची केस कोर्टातून खारीज (डिसमिस) कशी झाली, या गंभीर गुन्ह्यात गोवले गेलेले तरुण बाहेर कसे आले, त्याबाबतही सोशल मीडियावर विचारणा होत आहे.
... तिला उपरती झाली अन त्यांच्या बेड्या सुटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:22 AM