शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

ती तशी बेधडक, आली मात्र लाजतमुरडत

By नरेश डोंगरे | Published: December 10, 2022 7:21 PM

ती येणार, येणार म्हणून आवई उठली. त्यामुळे सर्वत्र बोलबाला झाला. अनेकांनी तिच्या संबंधाने अनेकांकडे विचारणा केली.

नागपूर : ती येणार, येणार म्हणून आवई उठली. त्यामुळे सर्वत्र बोलबाला झाला. अनेकांनी तिच्या संबंधाने अनेकांकडे विचारणा केली. मात्र, ज्यांनी तिचे यजमानत्व पत्करले, ते तिच्या येण्याबद्दल चकार शब्दही काढायला तयार नव्हते. त्यामुळे दोन तीन दिवस संशयकल्लोळ होता. अखेर ती आली. रात्रीच्या अंधारात, अगदी लाजतमुरडत. आता तिला बघण्यासाठी, तिच्या सानिध्याची अनेकांना ओढ लागली आहे.

तिचे वय तसे जास्त नाही. १५ फेब्रुवारी २०१९ ला ती अवतरली. आधी नवी दिल्ली आणि तेथून ती वाराणसीकडे झेपावली. काही दिवसानंतर नवी दिल्लीहून श्री वैष्णोदेवी माता दर्शनासाठी कटराकडे निघाली. नंतर मुंबईहून थेट गांधीनगर (गुजरात)कडे धावली. त्यानंतर भारताच्या अनेक प्रांताला तिने गवसणी घातली.

दरम्यान, अवघ्या पावणेचार वर्षांत तिने अनेकांना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या ठिकाणी सोडून त्यांची वाहवा मिळवली. त्यामुळे ती बेधडक आहे, सैराट आहे. एकदा निघाली की वाऱ्यावरच स्वार होते, असे काैतुकोद्गार तिच्यासाठी निघू लागले. दुसरीकडे ती नाजूक आहे, बेधडक असली तरी कुणाचे धडकने ती सहन करू शकत नाही, अशी कुजबुजही सुरू झाली. तिच्या एकूणच ख्याती-स्थितीची सर्वत्र चर्चा झाल्याने ती साऱ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरली. त्यामुळे तिच्या नुसत्या येण्याच्या चर्चेनेच अनेकांचे कान टवकारले जाते.

आता देशाच्या हृदयस्थळी ती येणार, नमन करणार, अशी आवई गेल्या आठवड्यात उठली अन् नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील यंत्रणा सजग झाली. ज्यांनी तिच्यासाठी शामियाना घालण्याचे ठरवले, ते मात्र चुप्पी साधून होते. त्यामुळे तिच्या येण्याबाबतचे कुतुहल जास्तच वाढले. अखेर दोन दिवसांपूर्वी ती येणार हे निश्चिंत झाले अन् नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र तिच्या स्वागतासाठी सज्ज झाला. तिच्या आगमनात कसलाही व्यत्यय येऊ नये म्हणून दिल्लीचा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) आला. मुंबईहून नॅशनल सिक्युरिटी ग्रुप (एनएसजी)चे कमांडो आले.

फोर्स वनही आली. हेच काय खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही तिला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी येणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, नागपुरात जोरदार तयारी सुरू आहे. जेथे येणार त्या रेल्वेस्थानकाला संपुर्ण खाकीने सुरक्षा कवच घातले आहे. असे सर्व उत्साही आणि भारावलेले वातावरण असताना ती नियोजित वेळेच्या ३६ तासांपूर्वीच शुक्रवारी रात्री नागपुरात आली, अगदी लाजतमुरडत. होय, तिच ती वंदे भारत ट्रेन आलीय !

बंदुकधाऱ्यांच्या गराड्यात सुरू आहे तिचे नटणेथटणे  

तिचे रुप अनेकांना मोहित करणारे आहे. रात्री तिच्या आगमनानंतर यजमानांनी तिचे नागपुरात छोटेखानी स्वागत केले अन् तिच्या मुक्कामाची व्यवस्था असलेल्या रेल्वे यार्डात तिला पाठविण्यात आले. तिच्या सुरक्षेसाठी चोहोबाजूने सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. बंदुकधाऱ्यांच्या गराड्यात तिचे नटणेथटणे सुरू आहे. त्यासाठी विशेष मेकअपमन अन् साजसज्जा बोलविण्यात आली आहे.  रविवारी सकाळी ती रेल्वेस्थानकावर येईल. अगदी नवरीसारखी नटून थटून. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वत: तिचे स्वागत करून तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छांचा ग्रीन सिग्नल देणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूर