लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन‘मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या १३ हजार ५६३ नागरिकांची १४१ निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे. निवारागृहातील विस्थापितांसाठी १४१ सामूहिक किचनच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज सोमवारी दिली.‘लॉकडाऊन’च्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी आज अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत. बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.अशी आहे जिल्हानिहाय व्यवस्थाजिल्हा निवारागृहे नागरिकांची व्यवस्थानागपूर ७३ ८,१७९वर्धा ७ २४०भंडारा ९ १०३२गोंदिया ८ १७२३चंद्रपूर ८ १६५०गडचिरोली ३६ ७३९१४१ सामूहिक किचनची सुरुवातजमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांचीनिवारागृहात सुविधा करण्यात आली आहे. निवारागृहातील नागरिकांसाठी भोजनाची सुविधा १४१ सामूहिक किचनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात ७३, वर्धा ७, भंडारा ९, गोंदिया, चंद्रपूर प्रत्येकी ८ व गडचिरोली जिल्ह्यातील ३६ सामूहिक किचनची सुविधा करण्यात आली आहे. सध्याच्या ठिकाणीच थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहातच राहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन करतानाच विभागात विस्थापितांच्या मागणीनुसार अजून शेल्टर होम सुरू करण्यात येतील, असेही विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कळविले आहे.
१३,५६३ बेघर-विस्थापित नागरिकांना निवारा : विभागीय आयुक्त संजीव कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:12 AM
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन‘मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या १३ हजार ५६३ नागरिकांची १४१ निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे.
ठळक मुद्देभोजन व औषध आदींची सुविधा