लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधान महोत्सवाची जनजागृती करण्याच्या हेतूने ‘शेरोशायरी’चा १२८ तासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्पमहापालिकेतील बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी केला आहे. त्यानुसार आशीनगर चौकातील एनआयटी हॉलमध्ये सोमवारी सकाळी ११.४५ वाजता या उपक्रमाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी त्यांनी सतत १२ तास शेरोशायरी केली.बसपाचे महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, प्रदेश प्रभारी संदीप ताजने, अभिषेक शंभरकर आदींच्या उपस्थितीत उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना यूथ वेलफेअर असोसिएशनचे सचिव मनीष पाटील यांची आहे. १ डिसेंबरला सायंकाळी ७ पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. शेरोशायरीत विश्वविक्रमाची नोंद नाही. त्यामुळे जमाल यांचा हा विश्वविक्रमच ठरणार आहे.विश्वविक्रमासाठी जमाल यांनी गेल्या काही महिन्यापासून १०० तास शेरोशायरीचा सराव केला आहे. त्यानंतर त्यांनी १२८ तास शेरोशायरीचा संकल्प केला. पुढील वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यानिमित्त त्यांना हा विक्रम समर्पित करणार आहे. ....१० मिनिटाच्या ब्रेकला नकारअशा विक्रमासाठी कलावंताला खाण्यापिण्यासाठी, औषध घेण्यासाठी तसेच आवश्यक नित्य कामासाठी २० मिनिटाचा ब्रेक दिला जातो. परंतु पहिल्या दिवशी मो.जमाल यांनी १० मिनिटांचा ब्रेक घेण्यालाही नकार दिला, अशी माहिती मनीष पाटील यांनी दिली.
नागपुरात विक्रमासाठी पहिल्या दिवशी १२ तास ‘शेरोशायरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:32 PM
संविधान महोत्सवाची जनजागृती करण्याच्या हेतूने ‘शेरोशायरी’चा १२८ तासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प महापालिकेतील बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी केला आहे. त्यानुसार आशीनगर चौकातील एनआयटी हॉलमध्ये सोमवारी सकाळी ११.४५ वाजता या उपक्रमाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी त्यांनी सतत १२ तास शेरोशायरी केली.
ठळक मुद्देसकाळी ११.४५ ला सुरुवात : मो.जमाल यांचा १२८ तासांचा विश्वविक्रमाचा संकल्प