लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला उद्योजक शिल्पा अग्रवाल यांनी यावर्षीचा मिसेस युनिव्हर्स लव्हली किताब पटकावला आहे. ही स्पर्धा नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील डरबन शहरात पार पडली. अग्रवाल यांच्या कामगिरीमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.सामाजिक कार्य करणाºया २१ ते ४५ वर्षे वयोगटातील विवाहित उद्योजक महिला या स्पर्धेत सहभागी होत असतात. यावर्षी १८४ स्पर्धक किताबाच्या शर्यतीत होते. परंतु, नागपूरकर अग्रवाल यांनी सर्वांना मागे टाकत किताबाला गवसनी घातली. स्पर्धेत अग्रवाल यांनी लावणी नृत्याद्वारे जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. लावणी सादर करण्यासाठी त्यांनी केंद्रीय उद्योग मंत्रालयाशी संलग्नित कंपनीने हातमागावर तयार केलेले वस्त्र परिधान केले होते.अग्रवाल वर्ष २००० पासून व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा फर्निचरचा व्यवसाय आहे. त्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सह व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी २०१५ मधील मिसेस इंडिया ग्लोबल स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले होते.म्यानमार येथे झालेल्या मिसेस इन्स्पिरेशन स्पर्धेत त्यांना विजेतेपद प्रदान करण्यात आले होते.याशिवाय त्यांना विदर्भातील उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांनी मिसेस युनिव्हर्स लव्हली किताब पटकावल्यामुळे शहरातील उद्योजक महिलांमध्ये आनंद पसरला आहे. अग्रवाल यांच्या यशामुळे अन्य उद्योजक महिलांना पुढे येण्याची प्रेरणा मिळाली आहे.
शिल्पा अग्रवाल मिसेस युनिव्हर्स लव्हली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:22 AM
महिला उद्योजक शिल्पा अग्रवाल यांनी यावर्षीचा मिसेस युनिव्हर्स लव्हली किताब पटकावला आहे.
ठळक मुद्देदक्षिण आफ्रिकेत झाली स्पर्धा : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा