लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी आक्रमक धोरण अवलंबले. संविधान चौक व तुकडोजी पुतळा चौकात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यानशिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली.शहर प्रमुख राजेश तुमसरे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी होत असताना पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. हे जनतेचे शोषण आहे. यावेळी पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण जुमळे, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, किशोर ठाकरे, दिगंबर ठाकरे, राजा रामद्वार, राजेश वाघमारे, संजोग राठोड, अनिल देशमुख, राम कुकडे, सुनील बॅनर्जी, संदीप रियाल पटेल सहभागी झाले होते.त्याचप्रकारे तुकडोजी पुतळा चौकात शिवसेना उपजिल्हा प्रमुख सूरज गोजे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या संकट काळात पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरवाढ मागे न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनात ओंकार पारवे, विलास मामुलकर, श्याम तेलंग, गुलाम रसूल, केतन रेवतकर, नरेंद्र्र मगरे, महेंद्र कठाणे, अनिल बोरकर, देवेंद्र्र माहुरकर, धीरज काटे, गुलाब भोयर, सागर मोनदेकर, विजय तलवारे, सुशील कोल्हे, अमित कातुरे, राजेश रुईकर, सोहेल अहमद, सुखदेव ढोके, तेजस गोजे आदींचा समावेश होता.
नागपुरात पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधत शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:53 AM