नागपूर : अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाच्या समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित न केल्यामुळे वाद उफळला होता. यावर शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, राममंदिर शिवसेनेसाठी अस्मिता व श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना यावर राजकारण करणार नाही.
नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही अयोध्येत गेले होते. मुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेतले होते. राममंदिर आस्था व भक्तीचे प्रतीक आहे, त्यामुळे यात राजकारण कसले? कोरोनाचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. जनतेला या संकटातून बाहेर काढण्याची सरकारची प्राथमिकता आहे.