शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कर्जमुक्तीसाठी शिवसेना रस्त्यावर

By admin | Published: June 06, 2017 6:03 PM

सोमवारी कोरची येथे पाळलेल्या बंदनंतर मंगळवारी शिवसेनेने या आंदोलनात उडी घेतली.

आॅनलाईन लोकमतकुरखेडा (गडचिरोली) : राज्यात पेटलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गडचिरोली जिल्ह्यात फारसा परिणाम नसला तरी सोमवारी कोरची येथे पाळलेल्या बंदनंतर मंगळवारी शिवसेनेने या आंदोलनात उडी घेतली. कुरखेडा-वडसा मार्गावरील आंधळी-चिखली फाट्यावर दोन तास वाहतूक रोखून चक्काजाम करण्यात आला. ‘शेतकऱ्यांचा एकच नारा, सातबारा कोरा’ अशा नाऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सकाळी १० ते १ वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनीही सहभागी होऊन सत्ताधारी भाजपविरूद्ध आपला रोष व्यक्त केला. यावेळी शेतमालाला दीड पट भाव द्या यासह इतरही मागण्यात करण्यात आल्या. यावेळी राज्य मार्गावर बऱ्याच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर तहसीलदार अजय चरडे यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पो.अधिकारी अभिजित फस्के, ठाणेदार योगेश घारे हेसुद्धा उपस्थित होते.शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात कुरखेडा न.पं.चे अध्यक्ष डॉ.महेंद्र मोहबंसी, माजी बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, नगरसेवक सोनू भट्ट, संतोष मारगोनवार, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, नरेंद्र तिरणकर, माजी जि.प.सदस्य अशोक इंदूरकर, सेनेचे तालुका प्रमुख आशिष काळे, धनेंद्र परिहार, दशरथजी लाडे, शेतकरी संघटनेचे नेते धिसू पाटील खुणे, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत किसनाके, सरपंच टिकाराम कोरेटी, माजी उपसभापती बबन बुद्धे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.