लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेतील गटबाजी अजूनही थांबलेली नाही. गटबाजीमुळे शहर शिवसेना गेल्या चार वर्षांपासून कार्यकारिणीविनाच काम करीत आहे. अनेक प्रयत्नानंतरही कार्यकारिणीचे गठन होऊ शकले नाही. आता कशीबशी नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव पूर्व नागपूरच्या कार्यकारिणीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली होती. परंतु आता या कार्यकारिणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असून याविरुद्ध असंतुष्ट गटाने शिवसेना भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.पक्षाच्या एका असंतुष्ट गटाने पूर्व शहर प्रमुख किशोर पराते यांच्या नेतृत्वात शनिवारी पत्रपरिषद घेऊन थेट माजी खासदार व पक्षाचे शहर जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांच्या कार्यपद्धतीवरच नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंजुरी न घेता कार्यकारिणी घोषित केली आहे. पक्षात ठाकरे यांच्या निर्देशानुसारच कार्यकारिणीची घोषणा करण्याची परंपरा आहे. आजवर जेवढ्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या पक्षप्रमुखांच्या आदेशान्वये सर्वप्रथम पक्षाचे मुखपत्र सामना या वर्तमानपत्रात प्रकाशित केल्या जातात. परंतु तसे घडले नाही. यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याविरुद्ध मुंबईत जाऊन तक्रार करण्यात येईल. तसेच शहरातील शिवसेना भवनासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रपरिषदेला नगरसेवक अजय दलाल, बंडू तळवेकर, दीपक शेंद्रे, वसंता डोंगरे, हरी बानाईत, नरेंद्र मगरे, संजय मोहारकर आदी उपस्थित होते.
शिवसेनेतील गटबाजी नागपुरात कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:50 AM
शिवसेनेतील गटबाजी अजूनही थांबलेली नाही. गटबाजीमुळे शहर शिवसेना गेल्या चार वर्षांपासून कार्यकारिणीविनाच काम करीत आहे. अनेक प्रयत्नानंतरही कार्यकारिणीचे गठन होऊ शकले नाही. आता कशीबशी नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव पूर्व नागपूरच्या कार्यकारिणीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली होती. परंतु आता या कार्यकारिणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असून याविरुद्ध असंतुष्ट गटाने शिवसेना भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
ठळक मुद्देपूर्व नागपूरच्या कार्यकारिणीवर प्रश्न उपस्थित : उपोषण करण्याचा इशारा