नागपूर : कधीकाळच्या आमच्या मित्रपक्षाने आता रंग बदलला आहे. त्याच्या भगव्या रंगावर दुसऱ्या पक्षाचा रंग चढला आहे. त्यामुळे भगव्याचा रंग आता फिका पडला आहे. आमचा रंग बदललेला नाही, असे म्हणणारी शिवसेना राष्ट्रपुरुषांचा अपमान होत असताना चूप का आहे? सत्तेच्या दडपणाखाली शिवसेना वावरत आहे, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला.
नागपूर शहर व जिल्हा भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार कोण चालवत आहे, हे समजत नाही. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात आहे. रिमोटच्या बॅटºया दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एक बोलतात, सिल्व्हर ओक दुसरे बोलतात, दिल्लीतून तिसरेच बोलले जाते, अशी अवस्था आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला कौल दिला आहे. मात्र आमच्याशी छळ झाल्यामुळे आम्हाला विरोधी बाकावर बसावे लागत आहे. पण आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत.
अराजकता माजविण्याचा डावसंपूर्ण देशात नागरिकता संशोधन विधेयक लागू करणार नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करूनही विरोधकांकडून अल्पसंख्यकांची दिशाभूल सुरू आहे. हा कायदा नागरिकता देण्यासाठी आहे, हिसकावण्यासाठी नव्हे. असे असतानाही देशात भय व त्यातून अराजकता माजविण्याचे काम विरोधक करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.आपण सामर्थ्यवान आहोत - गडकरीजो सर्वात सामर्थ्यवान असतो, त्याच्याविरुद्ध दुर्बल एकत्र येतात. भाजपाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत आहेत. याचाच अर्थ भाजप सामर्थ्यवान आहे. त्यांना आपल्या सामर्थ्याची भीती वाटत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.