नागपूर : मराठा सेवा संघ काटोल रोड शाखा व अनाथ पिंडक बुद्ध विहार यांच्या संयुक्त प्रयत्नातून वृंदावन कॉलनी काटोल रोड नागपूर येथे बौद्ध विहारात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून संभाजी ब्रिगेड प्रवक्ता प्रेमकुमार बोके व युवराज भांगे उपस्थित होते. यावेळी समाज विभाजक शक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन बोके यांनी केले. स्त्रियांनी गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे भांगे यांनी सांगितले. शिवचरित्रावर सुंदर कविता सादर केली. प्रास्ताविकात ओबीसी व बहुजन एकत्रीकरण कसे होईल, यावर समाजाने लक्ष द्यावे, असे आवाहन म.से.संघ सचिव पंकज निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रमोद वैद्य, अजय यावलकर, सुधीरजी वाळके आदींनी प्रयत्न केले.
भाजप, नंदनवन
- भाजप प्रभाग २७ तर्फे नंदनवन पानी टाकीजवळ शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी आ. कृष्णा खोपडे, भाजप राष्ट्रीय परिषद सदस्य सुभाष कोटेचा, वार्ड अध्यक्ष विजय ढोले, शंकरराव गायधने, बंडू देशकर, अजय सराडकर, महादेवराव हरणे, इब्राहिम चुडीवाले, हुसेन, ताहीर, सैय्यद हुसेन अली, हरीश दिकोंडवार उपस्थित होते. कोटेचा यांनी छत्रपतींच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी नरेंद्र भांगे, विनय शर्मा, सतीश कामडे, मोंटू करमे, रूपेश मेश्राम, गंगाधर बगमारे, प्रशांत तडसकर, विनोद मुरकुटे, किशोर भोस्कर, प्रतीक घोडे, मोहन करणकर, सोनू तडस, स्वप्निल रेवतकर आदींनी परीश्रम घेतले. संचालन पंकज गायकवाड यांनी केले.