मुंबई - नाशिक महामार्गावर असलेल्या मानकोली तालुक्यातील भिवंडी उड्डाण पुलाचे काम गेल्या सात वर्षांपासून रखडले आहे. या रखडलेल्या कामाबाबत शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे यांनी नागपूर अधिवेशनात सभागृहाबाहेर निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
गेल्या सात वर्षांपासून हे काम रखडले आहे. त्याचा या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. हे काम ज्या कंपनीला सोपवले, त्या सुप्रीम इन्फ्रास्टक्चर कंपनीकडून हे काम काढून दुसऱ्या कंपनीकडे सोपवावे अशी मागणी यावेळी आमदारांनी केली. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला तीनदा मुदतवाढ देण्यात आली होती. कंपनीच्या कामाचा दर्जाही निकृष्ट प्रतीचा असून, त्या कंपनीने अशी अनेक कामे अर्धवट सोडल्याकडेही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले. या कंपनीला सरकारने ब्लॅकलिस्ट करावे व तिच्यावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा यावेळी आमदारांनी दिला.