नागपूर : सावनेरजवळील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये उमरी (डॅम) येथे साकारलेल्या शिवतीर्थ अॅग्रो टुरिझमला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी मनोरंजनाच्या विविध सोयी उपलब्ध आहेत. विदर्भात पहिल्यांदा अॅग्रो टुरिझमसह वॉटर पार्क, बोटिंग व अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेण्याच्या संधी पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. मुंबईनंतर विदर्भात पहिल्यांदा बनाना बोट, सोपा बोट, स्लीपर बोट राईड, फ्लाय फिश आदी बोटी उपलब्ध आहेत. हेलिकॉप्टर जॉय राईडचे आयोजनही केले जाते. सावनेरपासून १२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत उमरी (डॅम) येथे विस्तीर्ण जागेत प्रकल्प असून, पर्यटकांना अॅग्रो टुरिझमच्या मुक्त आनंद घेण्याची संधी आहे. वाजवी दरात फार्म हाऊससुद्धा आहे. पर्यटक डीजेच्या तालावर, रेनडान्सचा आनंद लुटत आहेत. नैसर्गिक अॅडव्हेंचर पार्कमध्ये पर्यटकांना झिपलाईन, ब्रिजेश, शूटिंग, ट्रेकिंग आदी अॅक्टिव्हिटीमधून आनंदाची संधी मिळते. हे ठिकाण हिल स्टेशनवर असल्याने रात्रीच्या मुक्कामाला पर्यटकांची पसंती मिळत आहे. लग्न, वाढदिवस, बैठका घेता येतात. राज्य शासनाच्या एमटीडीसी विभागाची मान्यता आहे. कार्यालयीन, कौटुंबिक व समूह सहलीला प्रतिसाद आहे. नागपूर जिल्ह्यातील शिवतीर्थ अॅग्रो टुरिझम हे मनोरंजनासाठी एकमेव पर्यटन स्थळ आहे. (वा.प्र.)
शिवतीर्थ वॉटर पार्क व अॅग्रो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:07 AM