लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमधील काँग्रेसचे राजकीय संकट टळले. परंतु अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचा प्रभार परत घेण्यात आल्याने त्यांचे समर्थक मात्र चिंतेत पडले आहेत. त्यांच्या नेत्यांसोबत असे का झाले, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व पांडे यांच्यावर पुन्हा कोणती जबाबदारी सोपवितात, याची पांडे समर्थकांना प्रतीक्षा आहे.अविनाश पांडे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात नागपूर शहरातूनच झाली. ते पूर्व नागपूरचे आमदारही राहिले आहेत. नागपुरात त्यांचे अनेक समर्थक आहेत. विशेष म्हणजे पक्ष संघटनेत सक्रिय असलेले अनेक पदाधिकारी त्यांच्याशी जुळलेले आहेत. राजस्थानमधील राजकीय संकटादरम्यानही संवाद सुरू होता. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी दूर झाल्यानंतर काँग्रेसने पांडे यांना प्रभारी महासचिव पदावरून हटविले. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, पांडे यांचा वापर ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून करण्यात आला आहे. अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री पदावरून हटविणे शक्य नव्हते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पायलट यांची दुसरी मागणी मान्य करीत पांडे यांना हटविले. हा निर्णय अन्यायकारक असला तरीही वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय त्यांना मान्य आहे. या संकटातून ते बाहेर येतील, असा विश्वासही समर्थकांनी व्यक्त केला.समर्थकांशी फोनवर संवादप्रभारी पदावरून हटविण्यात आल्यानंतर पांडे यांनी आपल्या खास समर्थकांशी रविवारी रात्री फोनवर संवाद साधला होता. वरिष्ठ नेतृत्व त्यांना लवकरच नवीन जबाबदारी देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. चिंता करण्याची गरज नाही. राजकारणात असे होत राहते, असेही त्यांनी सांगितले होते. पांडे हे आठ ते दहा दिवस नागपुरात येणार नसल्याचा दावाही त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
अविनाश पांडेंना धक्का, समर्थक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 21:55 IST
राजस्थानमधील काँग्रेसचे राजकीय संकट टळले. परंतु अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचा प्रभार परत घेण्यात आल्याने त्यांचे समर्थक मात्र चिंतेत पडले आहेत.
अविनाश पांडेंना धक्का, समर्थक चिंतेत
ठळक मुद्दे राजस्थानचा प्रभार गेल्याने नाराजी