लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर, फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना युएस सिनेटरने विचारलेल्या ४४ प्रश्नांवर अॅड. लिमये यांनी अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षातून फेसबुक वापरणारे भारतातील २०० मिलियन लोकांचा डाटा असुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.फेसबुककडून ‘केम्ब्रिज अॅनालॅटिका’ कंपनीने डाटा विकत घेऊन, त्याचा निवडणुकीत वापर केला होता. हा डाटा ‘केम्ब्रिज अॅनालॅटिका’ कंपनीने २०१५ मध्ये विकत घेतला होता. ८७ मिलियन फेसबुक युजर्सच्या डाटाचा दुरुपयोग झाल्याचे २०१८ मध्ये उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगली होती. सोशल साईटचा असा दुरुपयोग होत असल्याबद्दल युएस संसदेने याची दखल घेऊन, युएस सिनेटरच्या माध्यमातून फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग याची चौकशी केली. यात त्याला ४४ प्रश्न विचारण्यात आले. यातील काही प्रश्नांची उत्तरे देण्यात झुकेरबर्ग असमर्थ ठरला. काही प्रश्नांवर त्याने दिलगिरी व्यक्त केली. युएस सिनेटरने विचारलेले प्रश्न आणि मार्क झुकेरबर्गने दिलेली उत्तरे याचा सखोल अभ्यास अॅड. लिमये यांनी केला. त्यांनी केलेल्या अभ्यासातून सोशल मीडियावर शेअर होत असलेली माहिती असुरक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यामते भारतात २०० मिलियन लोक फेसबुकचा वापर करतात. भारतीय हे डिजिटली निरीक्षर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लिमये यांच्या मते निव्वळ फेसबुकचा डाटा स्टोअर होत नाही तर फेसबुक ज्या माध्यमातून आपण वापरतो, त्या माध्यमातून जे काही अॅपस वेबसाईटवर आपण काम करतो, वापरतो तो सर्व डाटा सुद्धा फेसबुकला स्टोअर होतो. जसे मोबाईलवरून आपण बँकेचे व्यवहार करतो आणि त्या मोबाईलवरून फेसबुकसुद्धा वापरत असेल तर बँकिंग व्यवहाराची सर्व माहिती फेसबुककडे स्टोअर होते.लिमयेंच्या मते भारतात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत फेसबुक, गुगलने सर्वाधिक पैसा कमविला आहे. आता सरकार आपली प्रत्येक स्कीम सोशल मीडियावर आणते आहे. सोशल मीडियावरील डाटाचा असा दुरुपयोग होत असेल तर सरकारी माहितीसुद्धा सुरक्षित नाही. त्यामुळे सरकारनेदेखील त्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.- डाटा सोशल मीडियावर शेअर करू नकाअॅड. लिमये यांच्या मते त्रास होईल असा डाटा सोशल मीडियावर शेअर करू नका. मोबाईलवरून बँकेचे व्यवहार टाळावे. सरकारनेसुद्धा सोशल मीडियाचा अपेक्षित वापर टाळावा.