शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह सात जणांचा अत्याचार; ६ आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 10:59 AM

अन्य आरोपींचा शोध सुरूच : व्हिडीओ व्हायरल करण्याचे धमकावत दीड वर्षापासून सुरू होता अतिप्रसंग

पाटणसावंगी (नागपूर) : तरुणाने अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याची व्हिडिओ क्लीप तयार केली व मित्रांना पाठविली. त्याच्यासह मित्रांनी मुलीवर मागील दीड वर्षांपासून सुरू होता. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणातील सर्व फरार आरोपींपैकी सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात खापा पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी धीरज हिवरकर याने ओळखीचा फायदा घेत पीडित अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. या प्रकाराची व्हिडीओ क्लिप तयार करून त्याने इतर मित्रांना पाठवली. या क्लिपच्या आधारावर पीडितेला ब्लॅकमेल करत मित्रांनीही तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित करत लैंगिक अत्याचार केला. गेल्या दीड वर्षापासून हा प्रकार सुरू होता. बदनामीच्या भीतीने पीडितेने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच, ही बाब तिच्या पालकांना कळली. त्यांनी तत्काळ मंगळवारी खापा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती.

या प्रकरणात एकूण २२ जणांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि ३७६, ३५४ (अ), ३५४ (ड), ५०४, पोक्सोअन्वये गुन्हा नाेंदवत तपास सुरू केला आहे. यासोबतच धीरज हिवरकर, वेदांत आवते, गोलू लिखार, विकास हेडाऊ व लकी धार्मिक (सर्व रा. खापा, ता. सावनेर) या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, सर्व आरोपी फरार झाले होते. दरम्यान, मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी संध्याकाळपर्यंत विविध ठिकाणांहून आरोपींपैकी लिलाधर धर्मेंद्र चौरागडे (१९, रा. खैरी पंजाबराव), सुशील कृष्णा धार्मिक (१९), प्रणय सुनील डेकाटे (१९), निखील सदाशिव धांदे (२३), वेदांत विलास आवते (२३), गोलू रमेश लिखार (२४, सर्व रा. खापा) यांना अटक करण्यात यश मिळवले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

अटक झालेल्या आरोपींचा सात दिवसांचा पीसीआर घेण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबी टीम पीआय कोकाटे, एपीआय करमलवार यांनी केली व स्थानिय यांच्या संयुक्त कारवाईत विविध स्थानावरून मंगळवार ते बुधवार सायंकाळीपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास एसपी हर्ष पोद्दार व संदीप पखाले, डीवायएसपी अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनात सावनेर ठाणेदार रवींद्र मानकर व खापा ठाणेदार मनोज खडसे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणMolestationविनयभंगnagpurनागपूर