शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

धक्कादायक; प्रशिक्षणाला गेलेले नागपुरातील पोलीस पुण्याहून कोरोना घेऊन परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 8:39 PM

Nagpur News गुप्तवार्ता विभागाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेले नागपुरातील अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा घेऊन परतले आहे. प्रशिक्षणप्राप्त १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे शहर पोलीस दलात खळबळ३३ पैकी १२ पॉजिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुप्तवार्ता विभागाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेले नागपुरातील अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा घेऊन परतले आहे. प्रशिक्षणप्राप्त १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. (After going for training, the police from Nagpur returned from Pune with a corona)

गुप्तवार्ता (खुपिया) विभागात काम करणाऱ्या पोलिसांसाठी पुण्यात एसआरपीएफ, एमआयएतर्फे ३० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नागपुरातील ३३ महिला-पुरुष पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. २९ ऑगस्टला ते पुण्यात गेले. प्रशिक्षण ऑटोपून १० सप्टेंबरला ते परत आले. त्यातील काही जणांना शनिवारी दुपारपासून सर्दी पडसे आणि कणकण वाटू लागली. त्यामुळे काहींनी सुट्टीसाठी आपल्या वरिष्ठांकडे विचारणा केली. मात्र, गणेशोत्सव बंदोबस्तामुळे ठोस कारणाशिवाय सुट्ट्या देणे बंद असल्याने वरिष्ठांनी पोलीस हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना सल्ला दिला. या पार्श्वभूमीवर, शनिवारी काही पोलिसांची आरटीपीसीआर करून घेण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाचे लक्षण आढळले. पोलीस हॉस्पिटलचे डॉ. संदीप शिंदे यांनी ही बाब पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर प्रशिक्षणाला गेलेल्या ३३ ही जणांची तपासणी करून घेण्यात आली. त्यांच्यातील १२ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्वांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून, इतरांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांवरही लक्ष ठेवण्यात आले आहे.

लसीकरण झाले होते

बाधित आढळलेल्या १२ जणांमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून, या सर्वच्या सर्व १२ ही जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत, हे विशेष.

-----

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस